Sharjeel Imam : प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थी शर्जिल इमाम (Sharjeel Imam) याने अंतरिम जामिनासाठी दिल्ली न्यायालयात (Delhi court) धाव घेतली आहे. शर्जिलला बिहार विधानसभा (Bihar elections) लढवण्यासाठी दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन हवा आहे.
दिल्लीतील कर्करडूमा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर वाजपेयी यांच्यासमोर त्याने हा अर्ज केला आहे. याच न्यायालयात त्याच्याविरोधात दिल्ली दंगल प्रकरणात सुनावणी सुरू आहे. १५ ते २९ ऑक्टोबर या कालावधीसाठी जामीन मागितला आहे. बिहार विधानसभेसाठी १० व १६ ऑक्टोबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्याला बहादूरगंज मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधी आंदोलनांसंदर्भात अनेक प्रकरणांमध्ये तो आरोपी आहे. इतर प्रकरणांमध्ये जामीन मिळाला असला तरी तो सध्या दिल्ली दंगल कट प्रकरणात अटकेत आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर यूएपीए (बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा) लावला आहे. या प्रकरणात गेल्या २ सप्टेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने त्याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला होता. सध्या सर्वोच्च न्यायालयात त्याचा जामीन अर्ज प्रलंबित आहे.
हे देखील वाचा –
पुण्यात अभाविप – मनविसे वाद ! अमित ठाकरेंची आयुक्तांशी चर्चा
तुरुंगात गेल्यास मंत्री पदमुक्त ; इंडिया आघाडीचा समितीवर बहिष्कार
रमाबाई नगर रहिवाशांना दोन वर्षांत घरे बनवून देऊ ! मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही