२५ जुलैपासून ‘श्री रामायण यात्रा’ ट्रेन सुरू होणार

Ramayana-Yatra-Train

नवी दिल्ली- आईआरसीटीसी अर्थात भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन मंडळाच्यावतीने येत्या २५ जुलैपासून ‘श्री रामायण यात्रा ‘ या विशेष ट्रेनचा पाचवा दौरा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा १७ दिवसांची असून देशातील श्रीरामाशी संबंधीत ३० हून अधिक स्थळांना भेट देईल.

या रामायण ट्रेन यात्रेची सुरुवात दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनपासून सुरू होणार आहे. या प्रवासात यात्रेकरूंना अयोध्या, प्रयागराज, चित्रकूट, सीतामढी, जनकपूर, शृंगावेरपूर, नाशिक, हम्पी ते रामेश्वरमपर्यंत भगवान रामाशी संबंधित ठिकाणांना भेट देण्याची आणि प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभणार आहे. या आध्यात्मिक यात्रेचा तिकीट खर्च निवास वर्गावर अवलंबून असेल. त्यामध्ये ३ एसीसाठी १,१७,९७५ रुपये, २ एसीसाठी १,४०,१२० रुपये,१ एसी केबिनसाठी १,६६,३८० रुपये आणि खाजगी १ एसी कूपेसाठी १,७९,५१५ रुपये असा असेल.