Home / देश-विदेश / UK Grooming Gang: लंडनमध्ये शीख समुदायाचा संताप! अपहरण केलेल्या 16 वर्षीय मुलीची ‘ग्रूमिंग गँग’च्या तावडीतून सुटका

UK Grooming Gang: लंडनमध्ये शीख समुदायाचा संताप! अपहरण केलेल्या 16 वर्षीय मुलीची ‘ग्रूमिंग गँग’च्या तावडीतून सुटका

UK Grooming Gang: लंडनच्या पश्चिम भागात असलेल्या हाऊन्स्लो परिसरात एका 16 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला शीख समुदायाने...

By: Team Navakal
UK Grooming Gang
Social + WhatsApp CTA

UK Grooming Gang: लंडनच्या पश्चिम भागात असलेल्या हाऊन्स्लो परिसरात एका 16 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला शीख समुदायाने धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले. सुमारे 200 पेक्षा जास्त शीख बांधवांनी एकत्र येत केलेल्या निदर्शनांनंतर या मुलीची सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

तीन वर्षांपासून जाळे विणले

शीख प्रेस असोसिएशनच्या अहवालानुसार, आरोपीचे वय 30 ते 40 वर्षांच्या दरम्यान असून तो अफगाण मूळचा असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित मुलगी 13 वर्षांची असताना त्याने तिच्याशी मैत्री करून तिला आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली होती. मुलीने 16 वर्षे पूर्ण करताच तिला घर सोडण्यास प्रवृत्त करण्यात आले. या व्यक्तीवर याआधीही कमी वयाच्या मुलींशी संशयास्पद मैत्री केल्याचे आरोप शेजाऱ्यांनी लावले आहेत. कायदेशीर पळवाटांमुळे पोलीस हतबल असताना शीख संघटनांनी स्वतः पुढाकार घेऊन ही कारवाई केली.

काय आहे ‘ग्रूमिंग गँग’चा वाद?

ब्रिटनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ‘ग्रूमिंग गँग’ हा अत्यंत संवेदनशील आणि राजकीय मुद्दा ठरला आहे. या टोळ्या प्रामुख्याने अल्पवयीन मुलींना प्रेमजाळ्यात ओढून, त्यांचे शोषण करतात.

रोदरहॅम, रॉकडेल आणि टेलफोर्ड सारख्या शहरांमध्ये याआधी हजारो मुलींचे शोषण झाल्याचे समोर आले होते. यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानी वंशाच्या टोळ्यांचा सहभाग असल्याचे तपासात आढळले आहे. या प्रकरणांकडे वर्णद्वेषाच्या भीतीपोटी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने अनेक वर्षे दुर्लक्ष केल्याचा आरोपही सातत्याने होत आहे.

सरकारने जाहीर केली राष्ट्रीय चौकशी

या प्रकरणांचे गांभीर्य ओळखून ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये या टोळ्यांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय आयोगाची घोषणा केली आहे. ‘टेस्ला’चे सर्वेसर्वा एलन मस्क यांनीही ब्रिटनमधील या शोषण प्रकरणांवर कडक टीका केली होती, ज्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा जागतिक चर्चेत आला. शीख युथ यूके सारख्या संघटनांनी आता याविरोधात देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली असून पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या