Sonam Wangchuk : लेहमध्ये (Leh) झालेल्या हिंसाचाराला जबाबदार ठरवत अटक केलेले लडाखचे सामाजिक कार्यकर्ते (Social activist)व पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांची रवानगी जोधपूरच्या कारागृहात करण्यात आली आहे. लेहमधील स्थिती अद्याप तणावपूर्ण असून शहरात सलग चौथ्या दिवशीही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
लडाखला राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या आंदोलनावेळी (Protest)हिंसाचार झाला होता. त्यात ४ तरुणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले होते. ४० पोलिसही जखमी झाल्याचे सरकारने म्हटले आहे. या हिंसाचाराला जबाबदार धरत वांगचुक यांना त्यांच्या उल्याक्टोपो (Uleytokpo)गावातून अटक करण्यात आली. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे त्यांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवता येणार आहे.
लेहमध्ये शाळा व महाविद्यालये बंद असून सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर स्थिती अधिकच चिघळली आहे. प्रशासनाने मोबाईल इंटरनेट सेवाही बंद ठेवली आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा त्याचप्रमाणे लडाखचा समावेश संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. वांगचुक यांच्या अटकेसंदर्भात लेह अॅपेक्स बॉडीचे सहअध्यक्ष (Co-chairman of the Leh Apex Body) चेरिंग दोरजे म्हणाले की, पोलिसांनी आणि सीआरपीएफने आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याच्या तोफांचा वापर केला नाही किंवा इशारा देण्यासाठी हवेतही गोळीबार केला नाही. त्या ऐवजी त्यांनी आंदोलकांवर अंदाधुंद गोळीबार केला. लडाखच्या हक्काच्या लढाईची वांगचुक हे एक प्रमुख नेते असून त्यांच्या अटकेमुळे लडाखमधील नागरिकांमध्ये सरकारविरोधात तीव्र रोष पसरला आहे.
वांगचुक हे हिंसाचाराला चिथावणी न देता शांततापूर्ण आंदोलन करत असतात, असे येथील नागरिकांनी म्हटले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या आधीच वांगचुक यांच्या संस्थेचा परदेशी निधी मिळवण्याचा परवाना रद्द करण्यात आला असून त्यांच्याशी संबंधित अनेक संस्थांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
सोनम वांगचुक यांच्या अटकेमुळे चर्चेत आलेला ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ नेमका काय आहे? जाणून घ्या
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मुंबईत नवीन ६ बोगदे बांधणार
बिहार निवडणुकीपूर्वी मोदी यांची भेट; महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये