Home / देश-विदेश / Spain US Airspace Ban: इराण युद्धावरून स्पेन आणि अमेरिकेत ठिणगी; अमेरिकन विमानांना एन्ट्री नाकारली

Spain US Airspace Ban: इराण युद्धावरून स्पेन आणि अमेरिकेत ठिणगी; अमेरिकन विमानांना एन्ट्री नाकारली

Spain US Airspace Ban: इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्पेनने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. इराणवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या अमेरिकन...

By: Team Navakal
Spain US Airspace Ban
Social + WhatsApp CTA

Spain US Airspace Ban: इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्पेनने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. इराणवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या अमेरिकन लष्करी विमानांसाठी स्पेनने आपली हवाई हद्द (एअरस्पेस) पूर्णपणे बंद केली आहे. यापूर्वी स्पेनने आपल्या देशातील लष्करी तळांचा वापर करण्यास अमेरिकेला मनाई केली होती, आता या निर्णयाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.

स्पेनच्या संरक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

स्पेनच्या संरक्षणमंत्री मार्गरीटा रोब्लेस यांनी माद्रिदमध्ये पत्रकारांशी बोलताना या निर्णयाची पुष्टी केली. “इराणमधील युद्धाशी संबंधित कोणत्याही कारवाईसाठी आम्ही आमच्या लष्करी तळांचा किंवा हवाई हद्दीचा वापर करण्यास परवानगी देणार नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या बंदीमुळे आता अमेरिकन विमानांना मध्यपूर्वेकडे जाताना स्पेनला वळसा घालून जावे लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हे हल्ले बेजबाबदार आणि बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्पेनच्या अर्थव्यवस्था मंत्र्यांनी सांगितले की, हा निर्णय सरकारचा व्यापक भूमिकेचा भाग आहे. “आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आणि एकतर्फी सुरू झालेल्या युद्धात सहभागी न होण्याचा निर्णय स्पेन सरकारने घेतला आहे,” असे त्यांनी नमूद केले.

ट्रम्प यांची आर्थिक निर्बंधांची धमकी

स्पेनच्या या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. त्यांनी स्पेनवर आर्थिक परिणाम भोगण्याचा इशारा दिला असून माद्रिदसोबतचा व्यापार बंद करण्याची धमकी दिली आहे. याशिवाय, नाटोच्या (NATO) जीडीपीच्या 5 टक्के संरक्षण खर्चाचे लक्ष्य पूर्ण न केल्याबद्दलही ट्रम्प यांनी स्पेनवर टीका केली आहे. मात्र, इतका तणाव असूनही स्पेनच्या अधिकार्‍यांनी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध सध्या तरी स्थिर असल्याचे म्हटले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या