Home / देश-विदेश / देशाला पुढील 8 वर्षांत मिळणार 8 नवे सरन्यायाधीश; इतिहासात पहिल्यांदाच महिला सरन्यायाधीश

देशाला पुढील 8 वर्षांत मिळणार 8 नवे सरन्यायाधीश; इतिहासात पहिल्यांदाच महिला सरन्यायाधीश

CJI India

CJI India: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) पुढील 8 वर्षांच्या काळात 8 नवे सरन्यायाधीश (CJI) मिळणार आहेत. यापैकी अनेक सरन्यायाधीशांचा कार्यकाळ खूप कमी असेल, जो 36 दिवसांपासून ते सुमारे सव्वा 2 वर्षांपर्यंत असेल.

सध्याचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 रोजी संपणार आहे. नियमांनुसार, सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांची CJI म्हणून नियुक्ती केली जाते.

जस्टिस बी.आर. गवई यांच्यानंतर, ही जबाबदारी जस्टिस सूर्यकांत यांच्याकडे येईल. ते 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत या पदावर राहतील. त्यानंतर 10 फेब्रुवारी ते 23 सप्टेंबर 2027 पर्यंत जस्टिस विक्रम नाथ सरन्यायाधीश असतील.

भारताला मिळणार पहिली महिला सरन्यायाधीश

जस्टिस विक्रम नाथ यांच्यानंतरचा कार्यकाळ भारतीय न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे, कारण देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश म्हणून जस्टिस बी.व्ही. नागरत्ना यांची नियुक्ती होईल. त्यांचा कार्यकाळ फक्त 36 दिवसांचा म्हणजे 24 सप्टेंबर 2027 ते 29 ऑक्टोबर 2027 पर्यंत असेल.

त्या माजी सरन्यायाधीश इंगलगुप्पे सीतरमैया वेंकटरमैया यांच्या कन्या आहेत. यामुळे, CJI च्या यादीत वडील आणि मुलीचे नाव नोंदवले जाईल. याआधी, माजी सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड आणि धनंजय यशवंत चंद्रचूड यांचे नाव पिता-पुत्र म्हणून नोंदले गेले आहे.

सर्वांत मोठा कार्यकाळ आणि महत्त्वाच्या नियुक्ती

जस्टिस बी.व्ही. नागरत्ना यांच्यानंतर जस्टिस पामिदीघंटम श्री नरसिंहा (30 ऑक्टोबर 2027 ते 2 मे 2028) आणि नंतर जस्टिस जमशेद बुर्जोर पारदीवाला (3 मे 2028 ते 11 ऑगस्ट 2030) हे सरन्यायाधीश होतील. जस्टिस पारदीवाला यांचा कार्यकाळ गेल्या अनेक दशकांतील सर्वात मोठा, म्हणजेच 2 वर्षे, 3 महिने आणि 7 दिवसांचा असेल. यानंतर जस्टिस के.व्ही. विश्वनाथन आणि जस्टिस जयमाल्य बागची यांचा कार्यकाळ असेल.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

GST कपातीचा ग्राहकांना फायदा; टाटा मोटर्सच्या गाड्यांच्या किमतीत मोठी घट