नवी दिल्ली- चीनने (China) भारताची (India) जमीन हडप केली हे तुम्हाला कसे कळले? तुम्ही विरोधी पक्ष नेते (Opposition leader) आहात त्यामुळे असे प्रश्न तुम्ही समाजमाध्यमावर (Social media) नाही तर संसदेत उपस्थित केले पाहिजेत. अशा शब्दात आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कानपिचक्या दिल्या. सर्वोच्च न्यायालयाने लखनौ न्यायालयातील (Lucknow court) सुनावणीला स्थगिती दिली असून उत्तर प्रदेश सरकार व तक्रारदाराला नोटीसही पाठवली आहे.
राहुल गांधी यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान, चीनने भारताची जमीन हडपली असून चीनी सैनिक अरुणाचल प्रदेशात भारतीय सेनेच्या जवानांना मारत आहेत असे विधान केले होते. यावर लखनौ न्यायालयात त्यांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल करण्यात आला. त्याला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. न्या. दीपांकर दत्ता व न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसीह (Augustin George Christ) यांच्या पीठाने म्हटले की, चीनने भारताची २००० चौरस किलोमीटर जमीन व्यापली हे तुम्हाला कसे कळले? तुमच्याकडे काही विश्वासार्ह माहिती आहे का? कोणताही खरा भारतीय अशा प्रकारे बोलणार नाही. तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते तुम्ही संसदेत बोला. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही काहीही बोलता कामा नये.