Home / क्रीडा / T20 World Cup 2026 : २०२६ टी-२० वर्ल्ड कपसाठी शेवटचा पात्र ठरलेला संघ कोणता?

T20 World Cup 2026 : २०२६ टी-२० वर्ल्ड कपसाठी शेवटचा पात्र ठरलेला संघ कोणता?

T20 World Cup 2026 : क्रिकेट आणि टी-२० हे समीकरण सगळ्यांचं आवडीचं. त्यात आता टी-२० संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर...

By: Team Navakal
T20 World Cup 2026
Social + WhatsApp CTA

T20 World Cup 2026 : क्रिकेट आणि टी-२० हे समीकरण सगळ्यांचं आवडीचं. त्यात आता टी-२० संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. आयसीसी मेन्स टी २० वर्ल्ड कप २०२६च आयोजन भारत आणि श्रीलंकेत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व टीम्सची नावं अधिकृतपणे आता समोर आली आहेत. पण तुम्हाला यात कोणता संघ शेवटी पात्र ठरला या बाबत महिती आहे का?

शेवटच्या क्षणी संयुक्त अरब अमिरात (UAE) या टीमने उत्तम कामगिरी करत वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं होत. आता मोहम्मद वसीम यांच्या नेतृत्वाखालील यूएई टीमने जपानवर घवघवीत विजय मिळवत टी२० वर्ल्ड कपमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

टी २० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या टॉप २० टीम्सची निवड अनेक क्वालिफिकेशन फेऱ्यांमधून करण्यात आली. भारत आणि श्रीलंका हे दोन्ही देश यजमान असल्यामुळे त्यांना थेट प्रवेश मिळाला आहे. त्याचबरोबर २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टॉप ७ मध्ये स्थान मिळवलेल्या टीम्सनाही थेट २०२६ वर्ल्ड कपमध्ये आता स्थान देण्यात आल आहे. त्यामध्ये अंतिम पात्रता फेरीत कॅनडाने अमेरिकेशी झालेल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवला.

या टीममध्ये अजून कोणत्या देशांचा समावेश आहे ते पहा-
१. अफगाणिस्तान
२. ऑस्ट्रेलिया
३. बांग्लादेश
४.इंग्लंड
५. दक्षिण आफ्रिका
६. अमेरिका
७. वेस्टइंडीज

यानंतर, आयसीसी टी २० टीम रँकिंगमध्ये चांगलं स्थान मिळवलेल्या तीन टीम्सना देखील वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली. यात आयर्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या टीम्सचा देखील समावेश आहे.

युरोपियन क्वालिफायरमधून इटली आणि नेदरलँड या दोन टीम्सनी जागा पक्की केली. आफ्रिकन क्वालिफायरमधून नामिबिया आणि झिम्बाब्वे या टीम्स देखील पुढे आल्या आहेत. तर आशिया/EAP क्वालिफायरमधून नेपाळ, ओमान आणि यूएई या टीम्सने पात्रता सिद्ध केली आहे.

टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी एकूण पात्र ठरलेले देश
भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, यूएसए, वेस्टइंडीज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, कॅनडा, इटली, नेदरलँड, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान आणि यूएई.या सर्व देशांचा यात समावेश आहे.


हे देखील वाचा – Pune News : तुम्हीही सणासुदीला बाहेरून मिठाई आणता का? तर सावधान! दोन महिन्यात तब्ब्ल दोन कोटी रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या