Amir Khan Muttaqi : अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्ताकी (Amir Khan Muttaqi ) पुढील आठवड्यात भारत भेटीवर येत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने (UNSC) त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर लावलेले निर्बंध उठवले आहेत. तालिबानने २०२१ मध्ये अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतरचा कोणत्याही तालिबानी नेत्याने केलेला हा पहिला भारत दौरा आहे.
३० सप्टेंबर रोजी युएनएससीच्या निर्बंधविषयक समितीने मुत्ताकींवरील निर्बंध शिथिल करून त्यांना ९ ते १६ ऑक्टोबरदरम्यान भारत दौरा करण्याची परवानगी दिली.त्यामुळे मुत्ताकी यांच्या भारत दौऱ्याचा मार्ग मोकळा झाला.
याआधी सप्टेंबर महिन्यात मुत्ताकी भारत दौऱ्यावर येणार होते.मात्र अमेरिका आणि पाकिस्तानच्या विरोधामुळे युएनएससीने त्यांच्यावरील निर्बंध कायम ठेवले.त्यामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला होता.
भारताने अद्याप तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिलेली नाही. फक्त देशाचे हीत आणि अफगाणिस्तानमध्ये चीनचा वाढता प्रभाव पाहून भारताने काबूलमध्ये २०२२ मध्ये दुतावास पुन्हा सुरू केला.या पार्श्वभुमीवर मुत्ताकी यांचा हा दौरा उभय देशांसाठी महत्वपू्र्ण आहे.