Home / देश-विदेश / GDP वाढीत नंबर 1! ‘या’ राज्याने नेमकं केलं तरी काय? पाहा आकडे

GDP वाढीत नंबर 1! ‘या’ राज्याने नेमकं केलं तरी काय? पाहा आकडे

Tamil Nadu economic growth | तामिळनाडूने (Tamil Nadu economic growth) 2024-25 या आर्थिक वर्षात 9.69% इतकी रिअल इकॉनॉमिक ग्रोथ (Real...

By: Team Navakal

Tamil Nadu economic growth | तामिळनाडूने (Tamil Nadu economic growth) 2024-25 या आर्थिक वर्षात 9.69% इतकी रिअल इकॉनॉमिक ग्रोथ (Real Economic Growth) नोंदवत देशातील सर्व राज्यांमध्ये आघाडीचे स्थान मिळवले आहे. मागील दशकातील ही राज्याची सर्वाधिक आर्थिक वाढ ठरली आहे.

केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) आकडेवारीनुसार, तामिळनाडूचे सकल राज्य उत्पन्न (Gross Domestic Product – GDP) 2024-25 मध्ये 17.23 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 2023-24 मध्ये हे मूल्य 15.71 लाख कोटी रुपये इतके होते. ‘द हिंदू’ने याबाबत वृत्त दिले आहे.

आधीपेक्षा जोरदार वाढ

2017-18 मध्ये राज्याने 8.59% आर्थिक वाढ साधली होती, तर कोविड काळात ती घटून 0.07% वर आली होती. मात्र, या संकट काळातही तामिळनाडूने इतर राज्यांच्या तुलनेत सकारात्मक वाढ नोंदवत आपली आर्थिक क्षमता दाखवून दिली होती.

यंदा राज्याचा नॉमिनल ग्रोथ रेट (Nominal Growth Rate) 14.02% इतका असून तो देशात सर्वाधिक आहे. यामध्ये महागाईचा विचार न करता आर्थिक प्रगतीचा वेग दर्शविला जातो.

कोणत्या क्षेत्रांचा मोठा वाटा?

राज्याच्या या आर्थिक यशात सेवा (Tertiary) आणि दुय्यम (Secondary) क्षेत्रांचा मोठा वाटा आहे. व्यावसायिक सेवा (Professional Services), दूरसंचार (Communications), बांधकाम (Construction) आणि उत्पादन (Manufacturing) या क्षेत्रांनी मोठे योगदान दिले आहे.

सेवा क्षेत्रातील व्यावसायिक सेवांनी 13.6% तर दूरसंचार क्षेत्राने 13% वाढ नोंदवली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांनीही 11.7% योगदान दिले आहे. उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रांनी अनुक्रमे 8% आणि 10.6% वाढ साधली.

पुढील वर्षी दहा टक्क्यांची शक्यता?

मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (MSE) चे माजी संचालक डॉ. शनमुगम यांनी सांगितले की, “जर 2024-25 मधील आर्थिक वाढीला सर्व क्षेत्रांनी सध्याच्या पातळीपेक्षा केवळ 0.5% ने अधिक योगदान दिलं, तर 2025-26 मध्ये तामिळनाडूची वाढ तब्बल 10.7% इतकी होऊ शकते.”

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या