Home / देश-विदेश / Tarique Rahman : तारिक रहमान १७ वर्षांनी बांगलादेशात परतले ; विमानतळावर स्वागतासाठी लाखोंची हजेरी; तारिक रहमान पंतप्रधानपदासाठी संभाव्य दावेदार

Tarique Rahman : तारिक रहमान १७ वर्षांनी बांगलादेशात परतले ; विमानतळावर स्वागतासाठी लाखोंची हजेरी; तारिक रहमान पंतप्रधानपदासाठी संभाव्य दावेदार

Tarique Rahman : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे सुपुत्र तारिक रहमान तब्ब्ल १७ वर्षांनी देशात परतले आहेत. त्यांच्या पक्षाचे,...

By: Team Navakal
Tarique Rahman
Social + WhatsApp CTA

Tarique Rahman : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे सुपुत्र तारिक रहमान तब्ब्ल १७ वर्षांनी देशात परतले आहेत. त्यांच्या पक्षाचे, बीएनपीचे, एक लाख कार्यकर्ते ढाका विमानतळाजवळ त्यांच्या स्वागतासाठी एकत्रित जमले होते.

अटक टाळण्यासाठी रहमान यांनी २००८ मध्ये लंडनला पलायन केले होते. त्यावेळी हसिना सरकारच्या काळात त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक खटले प्रलंबित करण्यात आले होते. पुढील वर्षी १२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. त्यामध्ये शेख हसिना यांच्या पक्षावर, तसेच अवामी लीगवर बंदी घालण्यात आली आहे. परिणामी, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) विजयासाठी प्रमुख दावेदार असल्याचे देखील बोलले जात आहे.

बीएनपी अध्यक्षा खालिदा झिया या सध्या ८० वर्षांच्या आहेत आणि त्या गंभीर आजारी असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे, आगामी काळात पुढील पंतप्रधानपदासाठी रहमान दावेदार असू शकतात.

आजच्या स्वागत समारंभानंतर, तारिक रहमान एव्हरकेअर रुग्णालयात जाणार आहेत, जिथे त्यांची आई, माजी पंतप्रधान आणि बीएनपी अध्यक्षा खालिदा झिया मागच्या महिन्यापासून २३ नोव्हेंबरपासून उपचार घेत आहेत. हॉस्पिटलमधून तारिक गुलशन अव्हेन्यूवरील त्यांच्या निवासस्थानी ते जाणार आहेत.

खालिदा या शेजारच्या घरात राहतात, ज्याला “फिरोजा” म्हणून देखील ओळखले जाते. तारिक सध्या जिथे राहणार आहेत तो बंगला तारिक यांचे वडील दिवंगत राष्ट्रपती झियाउर रहमान यांचा होता. रहमान यांच्या हत्येनंतर, ते घर त्यांच्या पत्नी खालिदा झिया यांना दिले गेले.

खरं तर तारिक रहमान यांना पाहण्यासाठी लाखो लोक ३०० फूट रोडवर जमा झाले होते. ढाका येथे पोहोचल्यानंतर लगेचच, मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्याशी बीएनपी नेते तारिक रहमान यांनी फोनवरून संवाद साधला

संभाषणादरम्यान, सरकारने केलेल्या त्यांच्या परतीच्या व्यवस्थेबद्दल विशेषतः सुरक्षा उपायांबद्दल अंतरिम सरकारचे त्यांनी आभार मानले. ते म्हणाले, “माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने, मी तुमचे मनापासून आभार मानतो. तुम्ही अनेक व्यवस्था केल्या आहेत, विशेषतः माझ्या सुरक्षेसाठी.”ज्या व्यवस्था केल्या त्यासाठी मी तुमचा आभारी असल्याचे देखील ते म्हणाले.

निवडणुकीत रहमान यांना कोणाचे आव्हान असेल?

२०२४ च्या जुलै महिन्यात शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये बांगलादेशी इस्लामिक संघटना जमात-ए-इस्लामी (जेआय) ने सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून आले. हिंसाचार भडकवल्याचा गंभीर आरोप करत हसीना सरकारने जमात आणि त्यांच्या विद्यार्थी संघटनेवर, इस्लामी छात्र शिबीरवर बंदी घातली.

तथापि, ऑगस्ट २०२४ मध्ये, अंतरिम सरकारने जमात-ए-इस्लामीवरील बंदी उठवली आणि जून २०२५ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने पक्षाची नोंदणी पुन्हा पूर्वरत केली. हसीना देश सोडून गेल्यानंतर, नॅशनल सिटीझन्स पार्टी (एनसीपी) हे जमात-ए-इस्लामीच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित तरुणांनी स्थापन केली,
ज्यांचे काही नेते बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचा भाग सुद्धा आहेत.

शेख हसीना यांचा पक्ष येत्या निवडणुकांमध्ये भाग घेऊ शकणार नाही आहे. मोहम्मद युनूसचे प्रेस सचिव शफीकुल आलम म्हणतात की अवामी लीगला निवडणुकीत भाग घेऊ दिला जाणार नाही आहे.

या सगळ्याचा भारतावर परिणाम होईल का?
जेएनयूमधील आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे प्राध्यापक राजन कुमार यांच्या मते, तारिक रहमान यांचे बांगलादेशात परतणे ही एक मोठी आणि अतिशय महत्वाची अशी घटना आहे. तथापि, त्यांच्या पंतप्रधान होण्याबद्दल इतक्या लवकर काहीही सांगता येत कठीण आहे, कारण जमात-ए-इस्लामी देखील स्वतःचा पंतप्रधान उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे.

आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे प्राध्यापक राजन कुमार हे यावर अधिक स्पष्टता देतात की जर या सर्व गोष्टी असूनही तारिक पंतप्रधान झाले तर भारताला बांगलादेशच्या मुद्द्यावर आपली राजनयिकता तीव्र करावी लागेल, कारण तारिक यांच्या कार्यकाळात इस्लामिक कट्टरपंथीयांना अधिक चालना मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्याचा मोठा परिणाम बांगलादेशी हिंदूंवर होऊ शकतो.

त्यामुळे ते पाकिस्तानसोबत दीर्घकाळापासून चालत आलेला संरक्षण करार करू शकतात, ज्यामुळे पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम यासारख्या बांगलादेशच्या सीमेवरील राज्यांना सुरक्षित करण्यात भारताला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते.

हे देखील वाचा – Hero HF Deluxe: 70 किमीचे जबरदस्त मायलेज! ‘या’ बाईक ग्राहकांची तुफान मागणी; किंमत 60 हजारांपेक्षा कमी

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या