Tej Pratap Yadav Y+ Security : बिहार (Bihar Election) मध्ये सध्या निवडणूक हंगाम सुरू झाला.पहिला टप्पा संपला असून लवकरच दुसरा टप्पा होणार आहे. त्याआधी राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे दुरावलेले ज्येष्ठ पुत्र आणि जनशक्ती जनता दलाचे (Janshakti Janata Dal) संस्थापक तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तेजप्रताप यादव यांना केंद्र सरकारने तेजप्रताप यादव यांना आता वाय प्लस सुरक्षा ( Tej Pratap Yadav Y+ Security) देण्याचा निर्णय घेतला आहे.
गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर,सीआरएफ सुरक्षा पथक त्यांना प्रत्यक्षात सुरक्षा प्रदान करेल.व्हीआयपी सुरक्षा यादी अंतर्गत तेज प्रताप यादव यांना ही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.सुरक्षा एजन्सींनी अलीकडेच त्यांच्या सुरक्षेबाबत एक विशेष अहवाल सादर केला होता.त्यानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला.या प्रकारच्या सुरक्षेमध्ये ११ सशस्त्र पोलिस कमांडो तैनात असतात,ज्यामध्ये पाच पोलिस कर्मचारी व्हीआयपींच्या घराभोवती आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. शिवाय, सहा पीएसओ देखील तीन शिफ्टमध्ये सुरक्षा प्रदान करतात.









