पॅरिसच्या लोकांनी शंभर वर्षानंतर पहिल्यांदा सेन नदीत स्नान केले

permission to swim


पॅरिस– आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi)निमित्त पंढरपूरात जमलेला वैष्णवांचा मेळा जेव्हा चंद्रभागेत स्नान (Chandrabhaga River)करत होता. त्याचवेळी हजारो किलोमीटर दूर असलेल्या पॅरिसच्या नागरिकांनीही शंभर वर्षातून पहिल्यांदा सेन नदीत स्नान केले. पॅरिस प्रशासनाने (Paris administration)आपल्या नागरिकांना सेन नदीत पोहोण्याची (to swim)परवानगी दिली असून त्यासाठी किनाऱ्यावर काही जागाही निश्चित केल्या आहेत. त्या ठिकाणी हजारो पॅरिसकरांनी काल मोठ्या आनंदाने पोहोण्याचा आनंद घेतला. त्यांच्या आनंदी चित्कारांनी सेन नदीचा परिसर दुमदुमून गेला होता. फ्रान्स सरकारने १९२३ सालापासून सेन नदीत उतरण्याला बंदी घातली होती.


पॅरिस शहराच्या मध्यभागातून वाहणारी सेन नदी ही फ्रान्समधील महत्त्वाची नदी आहे. गेल्या वर्षी पॅरिस ऑलिंपिकचा उद्घाटन सोहळाही याच नदी पात्रात झाला होता. त्यावेळी या नदीतून हजारो टन गाळ काढण्यात येऊन नदीची पूर्ण स्वच्छता करण्यात आली होती. या नदीचे पाणी युरोपियन जलशुद्धी दर्जाची सुसंगत आहे. त्यामुळे या नदीत नागरिकांना पोहोण्याची परवानगी देण्यात आली. यासाठी प्रशासनाने काही कठोर नियमही तयार केले आहेत. नदीत उतरणाऱ्या प्रत्येकाला हाताला पिवळ्या रंगाचे चमकदार जीवरक्षक बँड अनिवार्य करण्यात आले होते. काल सकाळी जेव्हा या नदीत पोहोण्याची परवानगी देण्यात आली त्याआधी मध्यरात्री प्रशासनाने नदीतील काही उरले सुरले शेवाळही स्वच्छ केले. त्यानंतर हजारो पॅरिस करांनी नदीत उतरण्यासाठी ठिकठिकाणी रांगा लावल्या. लोकांना नदीत उतरणे सोपे व्हावे यासाठी आयफल टॉवर जवळ एक लाकडी घाटही बांधण्यात आला आहे. नदीत जेव्हा काल लोक उतरले तेव्हा नदीचा प्रवाहही नियंत्रित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे जागोजागी हजारो जीवरक्षकही तैनात करण्यात आले होते. पॅरिसमध्ये सध्या तापमान अधिक आहे. त्यात नदीत पोहोण्याचा आनंद काही अवर्णनीय होता. शहराच्या मध्यभागी वाहणाऱ्या नदीच्या स्वच्छ पाण्यात पोहोण्याचा आनंद अवर्णनीय असल्याची प्रतिक्रीया अनेक पॅरिस करांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी नदी स्वच्छ केल्यानंतर या नदीत पहिल्यांदा पोहोलेल्या पॅरिसच्या महापौर हॅनी हिडाल्गो काल किनाऱ्यावर उपस्थित होत्या. नदीचे स्वच्छ पाणी एका पारदर्शक बाटलीत भरून त्या लोकांना दाखवत होत्या. शहराच्या मध्यभागी प्रवाहित असलेल्या नदीच्या या स्वच्छतेने पॅरिसने जगापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.