TikTok India: गेल्याकाही दिवसांपासून शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉक (TikTok India) पुन्हा एकदा भारतात चर्चेत आले आहे. बंदी घातलेले हे अॅप पुन्हा भारतात सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, सरकारने बंदी उठवली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यातच आता टिकटॉक इंडियाने (TikTok India) गुरुग्राम येथील कार्यालयासाठी दोन पदांसाठी भरती सुरू केली आहे. कंपनीने लिंक्डइनवर (LinkedIn) “कंटेंट मॉडरेटर (बंगाली स्पीकर) ट्रस्ट अँड सेफ्टी” आणि “वेलबीईंग पार्टनरशिप अँड ऑपरेशन्स लीड” अशा पदांसाठी जाहिरात दिली आहे. काही आठवड्यांपूर्वीच टिकटॉकची वेबसाइट पुन्हा भारतात सुरू झाल्यानंतर, सरकारने अॅपवरील बंदी उठवल्याची अटकळ बांधली जात होती.
कंपनीची वेबसाइट भारतात सुरू झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नुकतेच स्पष्ट केले आहे की, भारतात टिकटॉक पुन्हा सुरू झाल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. सरकारी सूत्रांनी सांगितले की, “भारत सरकारने टिकटॉकवरील बंदी उठवण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही. असे कोणतेही विधान किंवा बातमी खोटी आणि दिशाभूल करणारी आहे.”
भारताने टिकटॉकवर बंदी का घातली होती?
चीनच्या बायटडान्स (ByteDance) कंपनीच्या मालकीचे टिकटॉक हे जून 2020 मध्ये भारत सरकारने बंदी घातलेल्या 59 मोबाईल ॲपपैकी एक होते. सरकारने ही ॲप्स भारताच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेसाठी हानिकारक असल्याचे कारण दिले होते.
पूर्व लडाखमधील 2020 च्या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीनमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.
अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितले होते की, ही बंदी घातलेली ॲप्स यूजर्सचा डेटा, जसे की लोकेशन, लीक करत आहेत आणि तो चीनमधील सर्व्हरवर पाठवत आहेत. बंदी घालण्यापूर्वी भारतात टिकटॉकचे सुमारे 200 दशलक्ष यूजर्स होते.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Gokul Milk Price: बाप्पा पावला! गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय; दुधाच्या खरेदी दरात वाढ
‘मराठा समाजाचे बांधव….’; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया; म्हणाला…