वाराणसी – गंगेच्या खोऱ्यात (Ganga basin h) झालेल्या मुसळधार पावसामुळे(Heavy rains)उत्तर प्रदेश व बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गंगा, यमुना आणि त्यांच्या उपनद्यांची पाणीपातळी वाढल्यामुळे संपूर्ण गंगाकाठ भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथक (NDRF and SDRF teams,) बचावकार्य करत आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी नेऊन पुरग्रस्तांसाठी तात्पुरती निवासस्थाने आणि मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj), मिर्झापूर, वाराणसी (Varanasi), गाझीपूर आणि बलिया (Ballia) जिल्ह्यांसह बिहारमधील बक्सर, भोजपूर, सारण, पटणा, वैशाली, समस्तीपूर, बेगूसराय, खगडिया आणि भागलपूर या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला. गंगा नदी (Ganga river)आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास धोक्याच्या पातळीपेक्षा २० सेमीवर वाहत होती. काशीतील सर्व ८४ घाट गंगेत बुडाले आहेत. प्रयागराजमध्ये पुराचे पाणी अनेक गावांत पोहोचले आहे. इथल्या एका घरात हे पाणी पोहोचले, तेव्हा तिथे राहाणार्या पोलीस अधिकाऱ्याने गंगा पूजन केले.
हिमाचल प्रदेशची (Himachal Pradesh) राजधानी शिमल्यामध्ये मुसळधार पावसामुळे कुमारसेन (Kumarsain region) येथील शनांदमध्ये राष्ट्रीय महामार्ग-५ दरड कोसळ्यामुळे बंद झाला. या रस्त्यावरील दरड हटवत असलेला एक जेसीबी मशीन डोंगरावरून तब्बल ३०० मीटर खोल दरीत कोसळला. या अपघातात जेसीबी चालक दिनेशकुमारचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामध्ये जेसीबी डोंगराच्या कड्या-कपारींना धडकत खाली कोसळताना दिसत आहे.
बिहारमधील (Bihar) सर्व ३८ जिल्ह्यांना मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. १८ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि २० जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत पाटणासह १३ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. पाटणामध्ये ६६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (heavy rainfall)शक्यता आहे. आसाम आणि मेघालयात अतिमुसळधार पावसासाचा रेड अलर्ट कायम आहे. पूर्व राजस्थानमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम राजस्थानमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट राहील.दक्षिण भारतीय राज्यांमध्ये पावसाची तीव्रता कमी होऊ शकते, परंतु तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील ९ जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ ऑगस्ट या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.