Toxic Gas Leak : झारखंडमध्ये ( Jharkhand)आज विषारी वायू गळती झाली. वायू गळती झालेल्या संशयास्पद “विषारी वायू गळती” (toxic gas leak) मध्ये, धनबाद जिल्ह्यातील केंदुआडीह भागात किमान दोन महिलांचा (women )दुर्दैवीन मृत्यू झाला आहे. आणि काही लोक रुग्णालयात दाखल असल्याचे वृत्त आहे. अधिकारी संशयित वायू गळतीचे स्रोत आणि कारण शोधत असल्याने निदर्शने सुरू झाली आहेत.
काल संध्याकाळी आणि आज सकाळी या दोन महिलांच्या मृत्यूमुळे रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. स्थानिकांकडून सांगण्यात आले की “गॅसच्या संपर्कामुळे” मृत्यू झाले, परंतु शवविच्छेदन ( post-mortem) अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे देखील वाचा –









