Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा दावा केला की भारत (India) चालू वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून होणाऱ्या कच्चे तेल (Russian oil) आयातीत जवळपास ४० टक्क्यांची कपात करणार आहे. भारतीय तेल कंपन्या अमेरिकेने निर्बंध लादलेल्या दोन रशियन कंपन्यांकडून दलालांमार्फत तेल खरेदी सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले जाते. मात्र याबाबत शंका आहे.
अमेरिकेने रशियातील रोसनेफ्ट आणि लुकोइल या मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.या कंपन्यांकडून भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील रिलायन्स कंपनी कच्चे तेल आयात करते. ही तेल खरेदी युरोपीय दलाल कंपन्यांमार्फत केली जाते. हा व्यवहार अमेरिकेच्या निर्बंधाच्या कक्षेबाहेर आहे. त्यामुळे अमेरिकेच्या निर्बंधाचा त्यावर परिणाम होत नाही. तरीही ट्रम्प यांनी म्हटले आहे की,रशियन कच्च्या तेलाची आयात बंद करण्याच्या प्रक्रियेत असल्याचे भारताने मला सांगितले आहे. ही एक प्रक्रिया असून ती अचानक बंद करता येत नाही.चालू वर्षाच्या अखेरपर्यंत भारत रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात जवळपास शून्य करणार आहे.









