Trump is dead Trending: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचे निर्णय-वक्तव्य यामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता थेट त्यांच्या मृत्यूची चर्चाच सोशल मीडियावर रंगली आहे.
ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड करत आहे. ‘Trump is dead’ या नावाने एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हजोरा पोस्ट ट्रेंड करत आहेत. यामुळे 79 वर्षीय ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
STREETS ARE SAYING TRUMP DEAD pic.twitter.com/7GQWN62p1i
— Ethan ¹² |-/ 🏴 (@KimiGoatanelli) August 30, 2025
अफवांना बळ
गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जुलै महिन्यात त्यांच्या हातावर जखम आणि पायाला सूज आल्याचे फोटो समोर आले होते. अलीकडेच त्यांच्या हातावरची जखम मेकअप लावून लपवल्याचे दिसले, ज्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले.
if trump is dead i will give 50 dollars to anyone who likes this tweet pic.twitter.com/sWOtuVhaDB
— Lila Velvet💗 (@VelvetVixenluv) August 30, 2025
या अफवांना आणखी जोर तेव्हा मिळाला, जेव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वॅन्स यांनी 27 ऑगस्टला एका मुलाखतीत, ‘जर काही दुर्घटना घडली तर मी पदभार सांभाळायला तयार आहे,’ असे म्हटले होते. त्यांनी लगेचच ट्रम्प यांची प्रकृती चांगली असल्याचे स्पष्टीकरण दिले असले, तरी त्यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले.
व्हाईट हाऊसचे स्पष्टीकरण
व्हाईट हाऊसने या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लिव्हिट यांनी सांगितले की, ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे लोकांचे प्रतिनिधी आहेत. ते रोज अनेक लोकांशी भेटतात आणि हस्तांदोलन करतात, जे इतर कोणत्याही राष्ट्राध्यक्षांपेक्षा जास्त आहे. त्यांची वचनबद्धता कायम आहे.’
ट्रम्प यांचे डॉक्टर डॉ. शॉन बार्बबेला यांनीही एक निवेदन जारी करत ट्रम्प यांच्या हातावरच्या जखमा हे वारंवार हस्तांदोलन केल्यामुळे आणि ॲस्पिरिनच्या वापरामुळे झाल्याचे म्हटले आहे. ॲस्पिरिनचा वापर हृदयाच्या आरोग्यासाठी केला जातो.
नेमका आजार काय?
जुलै महिन्यात ट्रम्प यांच्या पायाला सूज आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. यामध्ये त्यांना क्रोनिक वेनस इन्सफिशियन्सी (chronic venous insufficiency) हा आजार असल्याचे निदान झाले. हा आजार 70 वर्षांवरील लोकांमध्ये सामान्य असून, यात पायांच्या नसा हृदयाकडे रक्त पंप करण्यात असमर्थ ठरतात. डॉक्टरांनी हा आजार सौम्य असून, ट्रम्प यांची प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –