India-US Relations: मागील काही दिवसांपासून भारत-अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातील मैत्रीची देखील सातत्याने चर्चा होत असते. दोन्ही नेत्यांनी याबाबत अनेकदा उल्लेख देखील केला आहे.
मात्र, अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी एक मोठा दावा केला आहे. एकेकाळी डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात असलेले वैयक्तिक संबंध आता संपुष्टात आले आहेत, असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी भारताच्या वस्तूंवर लावलेल्या करांमुळे दोन्ही देशांमधील वाढलेल्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर बोल्टन यांचे हे वक्तव्य आले आहे.
एप्रिल 2018 ते सप्टेंबर 2019 पर्यंत ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केलेल्या बोल्टन यांनी अनेकदा त्यांच्या परराष्ट्र धोरणांवर टीका केली आहे.
‘ट्रम्प यांच्यासाठी वैयक्तिक संबंध महत्त्वाचे’
एका मुलाखतीत बोल्टन म्हणाले, “ट्रम्प यांचे नरेंद्र मोदींसोबतचे वैयक्तिक संबंध खूप चांगले होते, पण आता ते संपुष्टात आले आहेत. ही सर्वांसाठी एक मोठी शिकवण आहे.” ते पुढे म्हणाले की, “उदाहरणार्थ, यूकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर, त्यांच्याशी चांगले वैयक्तिक संबंध असले तरी, ते तुम्हाला ट्रम्प यांच्या सर्वात वाईट निर्णयापासून वाचवू शकणार नाहीत.”
बोल्टन यांच्या या वक्तव्यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50% कर लादला आहे, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी बीजिंगमध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत दिसले, ज्यामुळे भारताच्या बदललेल्या प्राधान्यक्रमांचे संकेत मिळत आहेत.
बोल्टन यांचे मोठे आरोप
बोल्टन यांच्या मते, ट्रम्प आंतरराष्ट्रीय संबंध त्यांच्या वैयक्तिक नात्यांच्या दृष्टिकोनातून पाहतात. “ट्रम्प यांचा व्लादिमीर पुतीन यांच्याशी चांगले संबंध आहे, म्हणून अमेरिकेचे रशियाशी चांगले संबंध आहेत, असे ते मानतात. पण प्रत्यक्षात तसे नाही,” असे बोल्टन म्हणाले.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
देशातील सर्वोत्तम कॉलेज कोणते? पाहा NIRF रँकिंग 2025 ची संपूर्ण यादी
थेट अजित पवारांना भिडणाऱ्या महिला IPS अधिकारी अंजली कृष्णा कोण आहेत?