Home / देश-विदेश / Trump-Putin Meeting: रशिया-युक्रेन युद्धावर ट्रम्प आणि पुतिन यांच्यात पार पडली महत्त्वाची बैठक, ‘या’ मुद्यांवर झाली चर्चा

Trump-Putin Meeting: रशिया-युक्रेन युद्धावर ट्रम्प आणि पुतिन यांच्यात पार पडली महत्त्वाची बैठक, ‘या’ मुद्यांवर झाली चर्चा

Trump-Putin Meeting

Trump-Putin Meeting: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यात अलास्का (Alaska) येथे एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. प्रामुख्याने रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीमुळे युरोपमधील सर्वात मोठ्या रशिया-युक्रेन युद्धाची दिशा ठरण्याची शक्यता आहे. पुतिन यांनी या बैठकीला ‘अत्यंत उपयोगी’ आणि ‘परस्पर आदराची’ असे संबोधले.

बैठकीनंतर बोलताना पुतिन म्हणाले की, जर 2022 मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते, तर युक्रेनसोबत युद्ध झालेच नसते. गेल्या पाच वर्षांतील दोन्ही नेत्यांची ही पहिलीच समोरासमोरची भेट होती.

“युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांच्या भूमिकेची आम्हाला पूर्ण खात्री आहे, आणि आता मॉस्को आणि वॉशिंग्टन यांच्यात खूप चांगले आणि थेट संबंध प्रस्थापित झाले आहेत,” असे पुतिन म्हणाले.

युक्रेन युद्ध थांबवण्यावर चर्चा

अलास्कामध्ये सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत युक्रेनमधील युद्ध हा एक मुख्य विषय होता. पुतिन यांनी ट्रम्प यांच्या ‘संघर्षाचे मूळ समजून घेण्याच्या इच्छेचे’ कौतुक केले. ते म्हणाले की, “रशियाला युद्ध संपवण्यात खरोखरच रस आहे, परंतु सर्व मूळ कारणे दूर केली पाहिजेत आणि रशियाच्या सर्व चिंता विचारात घेतल्या पाहिजेत.”

या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांना थोडक्यात माहिती दिली. ट्रम्प यांनी सांगितले की, “अनेक मुद्द्यांवर आमचे एकमत झाले आहे. काही मोठ्या मुद्द्यांवर पूर्ण तोडगा निघालेला नसला तरी आम्ही प्रगती केली आहे.” भविष्यातील भेटीबद्दल बोलताना पुतिन यांनी ट्रम्प यांना मॉस्कोलाचा येण्याचे देखील निमंत्रण दिले.