Home / देश-विदेश / ‘…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ डोनाल्ड ट्रम्प यांचा मस्क यांना थेट इशारा

‘…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ डोनाल्ड ट्रम्प यांचा मस्क यांना थेट इशारा

Trump Musk Feud | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि उद्योजक इलॉन मस्क (Elon Musk) यांच्यातील राजकीय आणि वैयक्तिक...

By: Team Navakal
Trump Musk Feud

Trump Musk Feud | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि उद्योजक इलॉन मस्क (Elon Musk) यांच्यातील राजकीय आणि वैयक्तिक संघर्ष आता टोकाला गेला आहे. एका वादग्रस्त खर्च विधेयकावरून सुरू झालेला वाद आता जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) प्रकरणापर्यंत पोहोचला असून, सोशल मीडियावर खुले आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर आरोप केल्यानंतर आता, ट्रम्प यांनी ‘गंभीर परिणाम’ भोगावे लागतील अशा शब्दात मस्क यांना इशारा दिला आहे.

एका मुलाखतीत ट्रम्प यांनी मस्क यांना इशारा दिला की, जर त्यांनी रिपब्लिकन खासदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे गंभीर परिणाम होतील. “जर त्यांनी तसं केलं, तर त्यांना खूप मोठा फटका बसेल,” असं ट्रम्प म्हणाले. मस्क यांनी खर्च विधेयकावर टीका करत, त्याला पाठिंबा देणाऱ्या रिपब्लिकन खासदारांविरुद्ध निधी उभारण्याचे संकेत दिले होते. यानंतर ट्रम्प यांनी हा इशारा दिला.

या टीकेनंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यातील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, मस्क यांच्याबरोबर पुन्हा संवाद साधण्याची त्यांची कोणतीही इच्छा नाही. त्यांनी मस्क यांना “अनादर करणारा” आणि “उद्धट” असं संबोधलं.

दरम्यान, मस्क यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ट्रम्प यांचं नाव एपस्टीन फाइल्समध्ये असल्याचा दावा केला आहे. “ट्रम्प यांचं नाव एपस्टीन फाइल्समध्ये आहे. म्हणूनच त्या अद्याप प्रसिद्ध झाल्या नाहीत,” असं मस्क यांनी ट्विट केलं. मात्र नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले.

ट्रम्प यांनी या आरोपाला “जुनी बातमी” म्हणत फेटाळून लावलं आणि सांगितलं की, एपस्टीनच्या वकिलानेही त्यांच्या सहभागाचे कोणतेही पुरावे नाकारले आहेत. ट्रम्प यांनी हेही स्पष्ट केलं की, एपस्टीनबरोबर त्यांचे सामाजिक संबंध होते, मात्र त्यांनी कधीही त्याच्या ‘लिटल सेंट जेम्स’ बेटावर भेट दिली नव्हती.

Web Title:
संबंधित बातम्या