Home / देश-विदेश / ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात फोनवर चर्चा; अमेरिकेत TikTok सुरू राहणार का? समोर आली माहिती

ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात फोनवर चर्चा; अमेरिकेत TikTok सुरू राहणार का? समोर आली माहिती

Trump-Xi Jinping Tiktok Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात तीन महिन्यांनंतर फोनवर चर्चा झाली. या...

By: Team Navakal
Trump-Xi Jinping Tiktok Deal

Trump-Xi Jinping Tiktok Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात तीन महिन्यांनंतर फोनवर चर्चा झाली. या चर्चेत अमेरिकेत TikTok ला सुरू ठेवण्यासाठीच्या बहुप्रतिक्षित करारावर मोठी प्रगती झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, व्यापार, कर आणि इतर तणावाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली.

या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा

ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘Truth Social’ वर ही चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले, “आम्ही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रगती केली.ज्यात व्यापार, फेंटानिल, रशिया-युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्याची गरज आणि TikTok कराराला मान्यता यांचा समावेश आहे.”

त्यांनी माहिती दिली की, TikTok ला अमेरिकेत सुरू ठेवण्यासाठीचा करार लवकरच अंतिम टप्प्यात येणार आहे. चीनकडून कृषी उत्पादनांची खरेदी आणि फेंटानिलची निर्यात यावर अधिक ठोस आश्वासने मिळवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे.

पुढील महिन्यात दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या APEC परिषदेत दोन्ही नेते भेटणार आहेत. तसेच, पुढील वर्षी अमेरिकेला आणि चीनला एकमेकांच्या देशात भेट देण्याची योजनाही आखण्यात आली आहे.

TikTok डील अंतिम टप्प्यात

TikTok च्या अमेरिकेतील भविष्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अमेरिकन काँग्रेसने जानेवारी 2025 पर्यंत TikTok ची चीनी मूळ कंपनी ByteDance ने अमेरिकेतील संपत्ती विकली नाही, तर ॲपवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. मात्र, ट्रम्प यांनी ही मुदत वारंवार वाढवली आहे.

त्यामुळे सध्या तरी अमेरिकेत टिकटॉकवरील बंदी टळली आहे. अमेरिकेतील अनेक कंपन्या टिकटॉक खरेदीसाठी प्रयत्न करत आहेत.

चर्चेत व्यापार मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले. ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर कर (Tariffs) वाढवले आहेत, ज्याला चीननेही प्रत्युत्तर दिले आहे. सध्या सेमीकंडक्टर तंत्रज्ञान आणि दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीसारखे काही महत्त्वाचे वादग्रस्त मुद्दे अजूनही बाकी आहेत.

हे देखील वाचा – ‘ऑपरेशन सिंदूर’ 4 दिवसांत का थांबवले? हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांनी सांगितले मोठे कारण

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या