Home / देश-विदेश / Neha Rathod: लोकगायिका नेहा राठोडच्या अडचणीत वाढ! दोन आरोप

Neha Rathod: लोकगायिका नेहा राठोडच्या अडचणीत वाढ! दोन आरोप

Neha Rathod: सोशल मीडिया (Social media) वरील प्रसिद्ध लोकगायिका (folk singer) नेहा राठोड (Neha Rathod) यांच्या विरोधात दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये...

By: Team Navakal
Neha Rathod
Social + WhatsApp CTA

Neha Rathod: सोशल मीडिया (Social media) वरील प्रसिद्ध लोकगायिका (folk singer) नेहा राठोड (Neha Rathod) यांच्या विरोधात दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये चौकशी सुरू झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर राठोड यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.

एका प्रकरणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पद्धतीने गाणे तयार केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्ते आणि हिंदूत्ववादी संघटनांनी वाराणसीतील १५ हून अधिक पोलीस ठाण्यांमध्ये ५०० हून अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत. यानंतर वाराणसी पोलिसांनी लखनऊ येथील राठोड यांच्या घरी जाऊन तिथे नोटीस लावली.

दुसऱ्या प्रकरणात हजरतगंज पोलिसांनी नेहा राठोड यांच्या सोशल मीडिया पोस्टबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी केलेल्या पोस्टमुळे दोन समुदायांमध्ये वैर वाढवून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नेहा यांच्या या पोस्ट पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर झाल्या आणि तेथील माध्यमांनीही त्याचा वापर भारतावर टीका करण्यासाठी केला, असेही या तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर नेहा राठोड यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली , मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. या आरोपांची चौकशी करणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राठोड यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.


हे देखील वाचा-

बोरिवलीत भाजपा-ठाकरे गटात हाणामारी

पालिकेच्या सहाय्यक आयुक्तावर मारहाण व खंडणीचे गंभीर आरोप- मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार

न्यायालयाचे आधीचे निकाल फिरवण्याची प्रवृत्ती चिंताजनक; सुप्रीम कोर्टाची नाराजी

Web Title:
संबंधित बातम्या