Unique spacecraft: आज कालच हे जग प्रगत आणि तितकच समृद्ध होत गेल आहे, ते दिवसेंदिवस इतकं जवळ येत आहे कि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण सहज संपर्क साधू शकतो. यालाच जोडत आजून एक आधुनिक यान समोर आलं आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्हाला एखादी वस्तू पाठवायची असेल तर आता अगदी तासाभरात ती पाठवता येणार आहे.
अमेरिकी एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनी ‘इन्व्हर्जन’ने जगातील पहिलं अस हे अनोखं डिलिव्हरी यान लाँच केल आहे, जे पृथ्वी तालावर कोणत्याही ठिकाणी फक्त एका तासाच्या आत आवश्यक सामान पोहोचवू शकते. यामधून २२७ किलो वजनाचं सामान एकावेळी पाठवता येऊ शकत. ‘आर्क’ असं या यानाचं नाव आहे. हे यान ताशी तब्बल २४,७०० किलोमीटर वेगानं ते प्रवास करू शकते. आर्क हे यान फक्त ८ फूट उंच आणि ४ फूट रुंद आहे. अंतराळातून परतताना स्वतःच स्वत:ला ते कंट्रोल करत आणि पॅराशूटच्या साहाय्यानं थेट लँडिंग करत.
सध्या स्पेसएक्ससारख्या कंपन्यांच्या सॅटेलाइट मिशनसाठी स्पेसक्राफ्ट लाँचिंग, परतीचा प्रवास आणि इतर खर्च मिळून सुमारे ५५ लाख डॉलर (सुमारे ४८ कोटी रुपये) इतका खर्च यामध्ये येतो. या तुलनेत ‘आर्क’चं ऑपरेशन अतिशय स्वस्त आहे, कारण ते पूर्णपणे रियुजेबल आहे.शिवाय आर्क हे यान आधीच पृथ्वीच्या कक्षेत ठेवलं जाईल आणि मग जेव्हा गरज भासेल, तेव्हा ते एका तासाच्या आत जगभर कुठेही आवश्यक डिलिव्हरी आता पोहोचवली जाणार आहे.
‘इन्व्हर्जन’चे को-फाउंडर जस्टिन फियास्केटी आणि ऑस्टिन ब्रिग्स यांच्या मते, आर्क हे एक क्रांतिकारी लॉजिस्टिक्स असे प्लॅटफॉर्म आहे, जे अंतराळात नेटवर्क तयार करून पृथ्वीला आपल्या ‘नजरेखाली’ ठवते.
यामुळे अनेक गोष्टी शक्य देखील होतील. नैसर्गिक आपत्ती, औषधं, लस, वैद्यकीय उपकरणं हे एका तासात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवणं शक्य होईल. या यानामुळे येणाऱ्या काळात अंतराळाचा वापर केवळ संशोधनापुरता मर्यादित राहणार नाही आहे. तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा –