US Embassy on Indian student Viral Video | अमेरिकेतील नेवार्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याला बेड्या घालून परत भारतात पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरव्हायरल झाल्यानंतर अमेरिकेतील भारतीय समुदायात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अमेरिकेत भारतीय तरुणाला अमानुष वागणूक दिल्याची घटना समोर आली होती.
या घटनेनंतर भारतातील अमेरिकन दूतावासाने स्पष्ट केले आहे की, अमेरिका व्हिसाचा कोणताही गैरवापर किंवा देशात बेकायदेशिरित्या प्रवेश करणे सहन करणार नाही.
भारतातील अमेरिकन दूतावासाने ट्विटरवर भूमिका स्पष्ट करत लिहिले की, युनायटेड स्टेट्स वैध प्रवाशांचे नेहमी स्वागत करते. मात्र, अमेरिकेत प्रवास करण्याचा कोणताही ‘हक्क’ नाही. आम्ही अवैध प्रवेश, व्हिसाचा गैरवापर किंवा अमेरिकेच्या कायद्याचे उल्लंघन सहन करू शकत नाही आणि करणार नाही.”
The United States continues to welcome legitimate travelers to our country. However, there is no right to visit the United States. We cannot and will not tolerate illegal entry, abuse of visas, or the violation of U.S. law. pic.twitter.com/WvsUb4Mtqu
— U.S. Embassy India (@USAndIndia) June 10, 2025
न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने (Indian Embassy in New York) या घटनेची दखल घेतली. त्यांनी म्हटले की, सोशल मीडियावर असे दावे करणाऱ्या पोस्ट्स समोर आल्या आहेत की, एका भारतीय नागरिकाला नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडचणींचा सामना करावा लागला. “आम्ही या संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी वाणिज्य दूतावास नेहमीच कटिबद्ध आहे,” असे दूतावासाने म्हटले.
दरम्यान, भारतीय विद्यार्थ्याला अमेरिकेतील विमानतळावर अमानुष वागणूक देतानाचा व्हिडिओ प्रथम भारतीय-अमेरिकन उद्योजक कुणाल जैन (Kunal Jain) यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर शेअर केला. त्यात विद्यार्थी रडताना आणि चार सुरक्षा अधिकाऱ्यांकडून जमिनीवर दाबून बेड्या घालताना पाहायला मिळते. त्यांनी या अमानुष वागणुकीविरोधात आवाज उठवत दूतावासाकडे हस्तक्षेपाची मागणी केली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासानेया घटनेची दखल घेतली. त्यांनी म्हटले की, सोशल मीडियावर असे दावे करणाऱ्या पोस्ट्स समोर आल्या आहेत की, एका भारतीय नागरिकाला नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडचणींचा सामना करावा लागला. आम्ही या संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. भारतीय नागरिकांच्या हितासाठी वाणिज्य दूतावास नेहमीच कटिबद्ध आहे,” असे दूतावासाने म्हटले.
दरम्यान, ही घटना अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर स्थलांतर धोरणांच्या पार्श्वभूमीवर घडली आहे. अलीकडेच लॉस एंजेलिसमध्ये स्थलांतरविरोधातील निदर्शने दडपण्यासाठी नॅशनल गार्डतैनात करण्यात आले होते, त्यामुळे विद्यार्थ्यावरील कारवाई अधिक चिंतेची बाब बनली आहे.