Home / देश-विदेश / US Government Shutdown : अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे सरकारी शटडाउन अखेर संपुष्टात; ट्रम्प यांची खर्च विधेयकावर स्वाक्षरी

US Government Shutdown : अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे सरकारी शटडाउन अखेर संपुष्टात; ट्रम्प यांची खर्च विधेयकावर स्वाक्षरी

US Government Shutdown : अमेरिकेच्या (USA) सरकारी कामकाजाला तब्बल 43 दिवसांपासून खिळ बसली होती, पण आता अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ...

By: Team Navakal
US Government Shutdown
Social + WhatsApp CTA

US Government Shutdown : अमेरिकेच्या (USA) सरकारी कामकाजाला तब्बल 43 दिवसांपासून खिळ बसली होती, पण आता अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेले हे सरकारी शटडाउन संपुष्टात आले आहे. अमेरिकेच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने (यूएस हाऊस) 222 विरुद्ध 209 मतांनी एक खर्च विधेयक (Spending Bill) मंजूर केले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विधेयकावर सही केली आहेत्यांच्या स्वाक्षरीनंतर, सरकारी कामकाजाला निधी मिळण्यास सुरुवात होईल आणि शटडाउन अधिकृतपणे मागे घेतले जाईल.

शटडाउन लागू होण्याचे मुख्य कारण म्हणजे, अमेरिकेची संसद सरकारी विभागांना चालवण्यासाठी वेळेवर अर्थसंकल्प किंवा निधी देणारे विधेयक मंजूर करू शकली नाही.

विधेयक मंजुरीसाठी 6 डेमोक्रॅटची मदत

या खर्च विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला विरोधी डेमोक्रॅट पक्षाच्या खासदारांच्या समर्थनाची गरज होती. रिपोर्टनुसार, रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखालील या विधेयकाला अखेर सहा डेमोक्रॅट नेत्यांनी पाठिंबा दिला आणि बाजूने मतदान केले.

करारामध्ये समाविष्ट असलेले प्रमुख मुद्दे

या करारामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सरकारला निधी मिळेल, ज्यामुळे सरकारी कामकाज तात्पुरते सुरळीत होईल. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या समझोत्यानुसार:

नोकरकपात झालेल्यांना दिलासा: शटडाउनमुळे ज्या केंद्रीय (संघीय) सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्यात आले होते, त्यांना पुन्हा कामावर घेतले जाईल.

थकलेले वेतन: सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे थकलेले वेतन (Back Pay) त्वरित देण्याची हमी सरकारने दिली आहे.

या मुद्द्यावर अजूनही तणाव

शटडाउनच्या लढाईत डेमोक्रॅट पक्षाची एक महत्त्वाची मागणी होती, ती महणजे रोग्य विमा अनुदानाच्या (Health Insurance Subsidy) हमीचा विस्तार करणे. ती या करारामध्ये स्पष्टपणे समाविष्ट करण्यात आलेली नाही. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जेव्हा कर सवलतींवर पुन्हा मतदान होईल, तेव्हा डेमोक्रॅटिक नेते आपली ही मागणी पुन्हा उचलून धरतील.

हे देखील वाचा – Delhi Car Blast : ‘भारत स्वतः सक्षम…’; दिल्ली स्फोट तपासणीबाबत अमेरिकेची महत्त्वाची प्रतिक्रिया

Web Title:
संबंधित बातम्या