Home / देश-विदेश / US shutdown: अमेरिकेचे शटडाऊन लांबले; निधी विधेयक चौथ्यांदा नामंजूर

US shutdown: अमेरिकेचे शटडाऊन लांबले; निधी विधेयक चौथ्यांदा नामंजूर

US shutdown – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) निधी विधेयक मंजूर करून घेण्यात चौथ्यांदा अपयशी ठरले. त्यामुळे शटडाऊन (shutdown)...

By: Team Navakal
US shutdown

US shutdown – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) निधी विधेयक मंजूर करून घेण्यात चौथ्यांदा अपयशी ठरले. त्यामुळे शटडाऊन (shutdown) सोमवारपर्यंत सुरूच राहील हे स्पष्ट झाले.

हे विधेयक सेनेटमध्ये मंजूर होण्यासाठी सरकार पक्षाला ६० मतांची आवश्यकता आहे. मात्र सेनेटमध्ये विधेयकाला ५४ मते मिळाली. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीने मांडलेल्या या विधेयकाला मंजूरी देण्यास डेमॉक्रेटिक पार्टीचा विरोध कायम आहे. या विधेयकावर मंगळवारी सेनेटमध्ये पहिल्यांदा मतदान झाले होते. त्यावेळी डेमॉक्रेटिक पार्टीने विधेयक मंजूर करण्यास नकार दिला. त्यानंतर बुधवारपासून शटडाऊन सुरू झाले आहे.

लाखो अमेरिकन लोकांना आरोग्य विमा देण्यासाठी साथीच्या काळातील आरोग्यसेवा अनुदाने वाढवा अशी डेमॉक्रेटिक पार्टीची मुख्य मागणी आहे. सेनेट आठवडाभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. त्यामुळे शटडाऊन सोमवारपर्यंत चालू राहाणार आहे.


हे देखील वाचा –

भोपाळच्या विद्यार्थ्यानी बनवली सूर्यप्रकाशावर चालणारी ई- बुलेट

दिवाळीत ग्राहकांना स्वस्त कांदा मिळणार

जोगेश्वरी मेट्रो स्थानकखालील खड्ड्यात तरुणाचा पाय अडकला

Web Title:
संबंधित बातम्या