Home / देश-विदेश / नव्या यूएस धोरणांचा भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम, व्हिसा अपॉइंटमेंट्स मिळेनात; शैक्षणिक वर्षावर संकट

नव्या यूएस धोरणांचा भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम, व्हिसा अपॉइंटमेंट्स मिळेनात; शैक्षणिक वर्षावर संकट

US visa slots | अमेरिकेत जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या उन्हाळ्यात यूएसमध्ये...

By: Team Navakal
US visa slots

US visa slots | अमेरिकेत जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या उन्हाळ्यात यूएसमध्ये शिक्षणासाठी जाण्याची तयारी करणाऱ्या अहमदाबादमधील विद्यार्थ्यांना व्हिसा मुलाखतींसाठी अपॉइंटमेंट्स (visa appointments) मिळत नसल्याने मोठा संभ्रम आणि तणाव निर्माण झाला आहे.

फेब्रुवारी व मार्चच्या सुरुवातीला अपॉइंटमेंट्स बुक करणाऱ्या विद्यार्थ्यांना एप्रिलचे स्लॉट (visa slots) मिळाले होते. मात्र मागील 20-25 दिवसांपासून मे महिन्यासाठी एकही अपॉइंटमेंट उपलब्ध नाही. यामुळे I-20 फॉर्म (I-20 form) आणि प्रवेश मिळवूनही विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे, असे अहमदाबादमधील व्हिसा सल्लागार मॉलिन जोशी यांनी सांगितले. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने बातमी दिली आहे.

यावर्षी यूएस दूतावासाने (US embassy) व्हिसा अपॉइंटमेंट स्लॉट बुकिंगमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवून सिस्टम अपडेट करणे सुरू केले आहे. त्यामुळेही स्लॉट्स उपलब्ध नसण्याचा परिणाम झाला आहे, असे इमिग्रेशन सल्लागार जनक नायक यांनी सांगितले. त्यांनी म्हटले, “१० मार्चपासून एकही स्टुडंट व्हिसा स्लॉट उपलब्ध नाही.”

नव्या अमेरिकन सरकारच्या (US immigration policies) धोरणांमध्ये बदल होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अजूनच गोंधळाचे वातावरण आहे. कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने अनेक विद्यार्थी Fall 2025 चुकवू शकतात, अशी चिंता रितेश देसाई या परदेशी शिक्षण सल्लागारांनी व्यक्त केली.

मागील जानेवारी सत्रासाठी विद्यार्थ्यांना वेळेवर अपॉइंटमेंट्स मिळाल्या होत्या आणि व्हिसा प्रक्रियेचा अनुभव चांगला होता. परंतु सध्याच्या गोंधळामुळे आणि अपॉइंटमेंट्सच्या अनुपलब्धतेमुळे संपूर्ण प्रक्रिया विस्कळीत झाली आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या