US Warns India of Higher Tariffs: रशिया-युक्रेन (Russia-Ukraine War) युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यात लवकरच बैठक होणार आहे. मात्र, ही बैठक अयशस्वी झाल्यास भारतावरील आयात शुल्क आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दोन्ही नेत्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी इशारा दिला आहे की, जर ट्रम्प आणिपुतिनयांच्यातील बैठक यशस्वी झाली नाही, तर अमेरिका भारतावर आणखी शुल्क (वाढवू शकते. ट्रम्प आणि पुतिन यांच्यात अलास्कामध्ये युक्रेन युद्धालापूर्णविराम देण्यासाठी चर्चा होणार आहे.
एका मुलाखतीत बोलताना बेसेंट म्हणाले, “रशियन तेल खरेदी केल्याबद्दल आम्ही भारतावर आधीच दुय्यम शुल्क लावले आहे. जर गोष्टी योग्य प्रकारे पार पडल्या नाहीत, तर हे शुल्क आणखी वाढवले जाऊ शकते.”
शुल्कवाढीचा वाद
याआधी, ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 25% शुल्क लावले होते. पण 7 ऑगस्ट रोजी त्यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल आणखी 25% शुल्क लावले, त्यामुळे एकूण शुल्क 50% झाले आहे. ट्रम्प यांनी भारतावर ‘रशियन तेल खरेदी करून युद्धासाठी मदत केल्याचा आरोप केला हहोता.
याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यावेळी झेलेन्स्की यांनी भारताला शांतता प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.
भारताची भूमिका
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) ट्रम्प यांनी लावलेले दुप्पट शुल्क ‘अन्यायकारक, असमर्थनीय आणि अयोग्य’ असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, भारताची तेल आयात बाजारातील घटकांवर आधारित असून, 1.4 अब्ज लोकांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही, असेही मोदींनी यापूर्वी सांगितले होते.