Home / देश-विदेश / चीनची कोंडी! अमेरिकेने लादला तब्बल 104 टक्के टॅरिफ, व्यापार युद्ध पेटणार?

चीनची कोंडी! अमेरिकेने लादला तब्बल 104 टक्के टॅरिफ, व्यापार युद्ध पेटणार?

US raises tariffs on China to 104% | अमेरिका (United States) आणि चीन (China) या दोन महासत्तांमधील आर्थिक तणाव पुन्हा...

By: Team Navakal

US raises tariffs on China to 104% | अमेरिका (United States) आणि चीन (China) या दोन महासत्तांमधील आर्थिक तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर तब्बल 104% आयात शुल्क (Import Tariff) लावण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली आहे. हे शुल्क लागू करण्यात आल्याची व्हाईट हाऊसने (White House) अधिकृत घोषणा केली आहे. चीनने ट्रम्प यांच्या धोरणांचा जोरदार विरोध केल्यानंतर हे नवीन शुल्क जाहीर झाले.

गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका चीनविरोधात व्यापार क्षेत्रात आक्रमक कारवाया करत आहे. फेब्रुवारीत 20%, मार्चमध्ये 34% आणि आता थेट 50% अशी टप्प्याटप्प्याने शुल्क वाढवण्यात आली आहे. या तीनही वाढींमुळे चीनमधील वस्तूंवरील एकूण शुल्क 104% वर पोहोचले आहे.

ट्रम्प यांनी सुरुवातीला चीनने अमेरिकन वस्तूंवर लावलेले 34% शुल्क मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र, चीनने ती फेटाळल्यानंतर अमेरिकेने ‘टिपल टॅरिफ स्ट्राइक’ केला आहे. ट्रम्प यांनी सुरुवातीला चीनने अमेरिकन वस्तूंवर लावलेले 34% शुल्क मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र, चीनने ती फेटाळल्यानंतर अमेरिकेने ‘टिपल टॅरिफ स्ट्राइक’ केला आहे. आता अमेरिकेने चीनवर आता अमेरिकेने चीनवर 104% आयात शुल्क (Import Tariff) लावण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेच्या निर्णयावर चीनने कडाडून टीका केली आहे. चीनचे पंतप्रधान ली कियांग (Li Qiang) यांनी याला “ब्लॅकमेल” असे संबोधले असून, “अखेरपर्यंत लढण्याचा” निर्धार व्यक्त केला आहे. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन (Ursula von der Leyen) यांच्याशी संवाद साधताना ली म्हणाले की, चीन कोणत्याही नकारात्मक बाह्य अडथळ्यांना तोंड देण्यास सक्षम आहे.

ते पुढे म्हणाले की, चीनच्या 2025 आर्थिक धोरणामध्ये सर्व अनिश्चिततांचा विचार करण्यात आला आहे आणि अमेरिका जे आर्थिक दबाव तंत्र वापरत आहे ते एकतर्फीवाद, संरक्षणवाद आणि दबाव धोरणाचे उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला.


हे शुल्क लागू होताच चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध नव्या व्यापारयुद्धाच्या दिशेने झुकले आहेत. चीनने आपल्या तातडीच्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या असून, बीजिंगच्या मते हे उत्तर केवळ स्वतःच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे.

दरम्यान, अमेरिकेचे टॅरिफ धोरणामुळे जागतिक बाजाराची चिंता वाढली आहे. जगभरात आर्थिक मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या