Home / देश-विदेश / V shantaram Movie : व्ही शांतारामन चित्रपटात हा अभिनेता साकारणार महत्वाची भूमिका..

V shantaram Movie : व्ही शांतारामन चित्रपटात हा अभिनेता साकारणार महत्वाची भूमिका..

V shantaram Movie : आजवर अनेक बायोपिक बनवले गेले जे वायरल देखील झाले. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान...

By: Team Navakal
V shantaram Movie
Social + WhatsApp CTA

V shantaram Movie : आजवर अनेक बायोपिक बनवले गेले जे वायरल देखील झाले. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. या महापुरुषाचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य चित्रपटाच्या महाकाव्यातून मोठ्या पाड्यावर उलगडणार आहे.

स्टुडिओमधील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास,त्यांची धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी यांना व्ही. शांताराम यांची भव्यदिव्य अशी भूमिका साकारायला मिळणार आहे. ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतीत एक गेम चेंजर ठरणार आहे.

‘व्ही. शांताराम’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. सोशल मिडियावर हे पोस्टर तुफान वायरल होत आहे. दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. ते म्हणतात, ‘’व्ही. शांताराम हे नाव उच्चारताना केवळ एका व्यक्तीची चर्चा होत नाही, तर भारतीय चित्रपटाची संपूर्ण तत्त्वज्ञानपर परंपरा हे सगळे डोळ्यांसमोर उभे राहते. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांची निष्ठा, प्रयोगांची भीती न बाळगता कलाप्रवाहात झेप घेण्याची त्यांची हिंमत हे सर्व पडद्यावर साकारताना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळते. चित्रपटाच्या एका पोस्टरने सोसिअल मीडियावर इतकी हवा केली आहे कि या चित्रपटाच्या रिलीजला तुफान राडा होणार का हे पाहणे रंजनकारक ठरणार आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या