Home / देश-विदेश / गुजरातमध्ये साबर डेअरी विरूध्द शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन

गुजरातमध्ये साबर डेअरी विरूध्द शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन

अहमदाबाद – दूध दरात (milk procurement prices) २५ टक्के वाढ करण्याच्या मागणीसाठी हजारो शेतकरी आणि पशुपालकांनी (farmers and cattle rearers)...

By: Team Navakal
Violent protest at Sabar Dairy

अहमदाबाद – दूध दरात (milk procurement prices) २५ टक्के वाढ करण्याच्या मागणीसाठी हजारो शेतकरी आणि पशुपालकांनी (farmers and cattle rearers) साबरकांठा जिल्ह्यातील साबर डेअरी विरूध्द (Sabar Dairy) तीव्र आंदोलन केले. काही वेळातच या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी डेअरीच्या आवारात घुसून तोडफोड केली, दगडफेक करत सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) फोडले. लोखंडी ग्रील तोडून मुख्य प्रवेशद्वारात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी (police)लाठीमार व अश्रुधुराच्या नळ्या फोडून आंदोलकांना पांगवले. यामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत.

आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांनी हिमतनगर-तलोड महामार्ग अडवून वाहतूक ठप्प केली होती. त्यामुळे डेअरी परिसरात आणि आजूबाजूला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकरी व पशुपालकांचा आरोप आहे की, गेल्या वर्षी डेअरीने ६०२ कोटींचा बोनस देत दूध दरात १७ टक्के वाढ केली होती. मात्र यंदा बोनस केवळ ५०० कोटींवर आणल्याने प्रोत्साहन दर फक्त ९.७५ टक्के वाढवण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. बोनस कपातीचा थेट परिणाम दूध दरावर झाला आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या