Home / देश-विदेश / शिमला करार अमेरिकेच्या दबावाखाली झाला होता का? भाजपाचा काँग्रेसला सवाल

शिमला करार अमेरिकेच्या दबावाखाली झाला होता का? भाजपाचा काँग्रेसला सवाल

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७२ मध्ये झालेल्या शिमला करारावरून (Shimla Agreement) नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपाचे...

By: Team Navakal
Nishikant Dubey allegations against Indira Gandhi
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७२ मध्ये झालेल्या शिमला करारावरून (Shimla Agreement) नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे (BJP MP Nishikant Dubeyयांनी शिमला करार अमेरिकेच्या दबावाखाली करण्यात आला होता का, असा सवाल करत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (former Prime Minister Indira Gandhi) यांच्यावर आरोप केले आहेत.

दुबे एक्सवर राज्यसभेतील एका जुन्या चर्चेचा दस्तऐवज शेअर करत म्हणाले की, आयर्न लेडीने (Iron Lady) (इंदिरा गांधी) भारताच्या ताब्यातील ५ हजार चौरस मैल भूभाग पाकिस्तानला का दिला? ३० हजार चौरस मैल भूभाग कोणाच्या दबावामुळे पाकिस्तानकडेच राहिला? ९३ हजार पाकिस्तानी सैनिक परत पाठवताना आपल्या ५६ भारतीय सैनिकांना पाकिस्तानच्या तुरुंगात का मरू दिले? काँग्रेसचे सदस्य आणि माजी संरक्षणमंत्री महावीर त्यागी आणि भाजपा व जनसंघाचे ज्येष्ठ नेते भाई महावीर यांनी हे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, त्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि परराष्ट्रमंत्री स्वर्ण सिंह यांनी राज्यसभेत याची उत्तरे दिली नाहीत.

या आरोपांवर काँग्रेसने (Congress) जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले की, माध्यमे एका ढोंगीवर वेळ का वाया घालवत आहेत? हे व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीचे (WhatsApp University) नाही, तर व्हॉट्सअ‍ॅप नर्सरीचे (WhatsApp Nursery) विद्यार्थी आहेत. त्यांना थेट पंतप्रधान कार्यालयात (PMO Office) जाऊन शिमला करार रद्द करा म्हणून सांगायला सांगा. इथे वाद घालण्यात काय अर्थ आहे?

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या