Home / देश-विदेश / Doomsday Plane : ‘डूम्स्डे प्लेन’ काय आहे? इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या या विमानाची चर्चा होण्याचे कारण काय? 

Doomsday Plane : ‘डूम्स्डे प्लेन’ काय आहे? इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या या विमानाची चर्चा होण्याचे कारण काय? 

Doomsday Plane | इराण-इस्त्रायल संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या संघर्षात अमेरिका देखील इस्त्रायलच्या बाजूने उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात...

By: Team Navakal
Serious Security Lapses at Airports

Doomsday Plane | इराण-इस्त्रायल संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या संघर्षात अमेरिका देखील इस्त्रायलच्या बाजूने उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता अचानक अमेरिकेच्या लष्करातील सर्वात गोपनीय विमानांपैकी एकअसलेले बोइंग ई-4बी नाईटवॉच (Boeing E-4B Nightwatch) हे अचानक वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये दाखल झाल्याने काहीतरी मोठे घडणार का? अशी चर्चा रंगली आहे.

बोइंग ई-4बी नाईटवॉचला ‘डूम्स्डे प्लेन’ (Doomsday Plane) म्हणून ओळखले जाते. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अचानक मेरीलँडमध्ये दाखल झाले. विमानाच्या अनपेक्षित मार्गाने आणि ‘ऑर्डर 01’ या नव्या कॉलसाइनमुळे ही मोहीम तातडीची असल्याची चर्चा आहे.

डूम्स्डे प्लेन काय आहे?

‘फ्लाइंग पेंटागॉन’ असेही संबोधले जाणारे ई-4बी हे अणुयुद्ध किंवा राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी कार्यरत राहणारे हवेतून नियंत्रण करणारे लष्करी कमांड सेंटर आहे. हे विमान खास अणुयुद्ध (Nuclear War) किंवा मोठ्या राष्ट्रीय आपत्तीसारख्या (National Catastrophe) गंभीर परिस्थितीत वापरण्यासाठी डिझाइन केलं आहे.

‘डूम्स्डे प्लेन’ची वैशिष्ट्ये काय आहेत?

  • हवाई कमांड सेंटर: हे विमान आकाशात एक फिरते लष्करी कमांड सेंटर म्हणून काम करते.
  • संरक्षण क्षमता: अणुबॉम्ब हल्ल्यांमुळे निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स (Electromagnetic Pulses) आणि अणुस्फोटांपासून संरक्षण करण्यासाठी ते मजबूत बनवलं आहे.
  • दळणवळण: यात जवळपास 67 सॅटेलाइट डिश आणि अँटेना आहेत, ज्यामुळे जगभरात दळणवळण साधता येते.
  • दीर्घकाळ उड्डाण: हवेतच इंधन भरण्याची सोय असल्यामुळे हे विमान 35 तासांपेक्षा जास्त काळ हवेत राहू शकते.
  • आपत्कालीन उपयोग: संकटाच्या काळात हे विमान अमेरिकेच्या राष्ट्रीय कमांड अथॉरिटीचा मुख्य केंद्रबिंदू बनतं.
  • विशेष रचना: विमानाच्या आतमध्ये 18 बेड, बैठकांसाठी जागा, समन्वय आणि चर्चेसाठी क्षेत्रे, एक कमांड स्पेस आणि आराम करण्याची जागा अशा सोयी आहेत. तीन स्तरांवर पसरलेल्या या सुविधांमुळे ते आपत्कालीन परिस्थितीत ‘फ्लाइंग पेंटागॉन’ (Flying Pentagon) बनतं.

मध्यपूर्वेतील तणाव आणि ट्रम्प यांचा इशारा

इस्त्रायलच्या इराणवरील तीव्र हवाई हल्ल्यांनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त आत्मसमर्पणाची मागणी केली आहे. ‘मात्र, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी अमेरिकेच्या हस्तक्षेपास ‘भरून न येणारे नुकसान’ होईल, असा इशारा दिला. याचवेळी, दोन इराणी सरकारी विमाने ओमानकडे रवाना झाल्याने आपत्कालीन मुत्सद्देगिरी किंवा स्थलांतर मोहिमेची शक्यता वर्तवली जात आहे.

विमानाचा ऐतिहासिक वापर

ई-4बीचा वापर मोठ्या घटनांमध्ये झाला आहे. 9/11 च्या हल्ल्यांनंतर माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी याच विमानाचा वापर केला होता, तर 1995 मध्ये हरिकेन ओपलदरम्यान फेमा अधिकाऱ्यांनी याचा उपयोग केला. सध्या अमेरिकेचे हवाई दल या विमानांचे आधुनिकीकरण करण्यासाठी 13 अब्ज डॉलरचा कार्यक्रम राबवत आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या