Home / देश-विदेश / बलात्कारपिडीतेचे नाव जानकी का नको? हायकोर्टाचा सेन्सॉर बोर्डाला सवाल

बलात्कारपिडीतेचे नाव जानकी का नको? हायकोर्टाचा सेन्सॉर बोर्डाला सवाल

तिरुवनंतरपुरम- आपल्या वरील अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या बलात्कारपिडीत व्यक्तिरेखेचे नाव जानकी का नसावे, अशा प्रश्न उपस्थित करत केरळ उच्च न्यायालयाने (Kerala...

By: Team Navakal
Kerala High Court


तिरुवनंतरपुरम- आपल्या वरील अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या बलात्कारपिडीत व्यक्तिरेखेचे नाव जानकी का नसावे, अशा प्रश्न उपस्थित करत केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) काल सेन्सॉर बोर्डाच्या (Censor Board) कारभारावरच ताशेरे ओढले आहेत. आता तुम्ही दिग्दर्शक व इतरांना सांगणार का की पात्रांची नावे काय असावीत. बलात्कार करणाऱ्यांची नावे राम, कृष्ण नसतील तर बलात्कार पिडीतेचे नाव जानकी असल्याने आक्षेप घेण्याचे कारणच काय अशा शब्दात न्यायालयाने खडसावले.

जेएसके अर्थात जानकी विरुद्ध स्टेट ऑफ केरला या मल्याळम चित्रपटाच्या (Malayalam movies) निर्मात्यांनी सेन्सॉर प्रमाणपत्र मिळण्यात होत असलेल्या विलंबाबाबत ही याचिका दाखल केली होती. सेन्सॉर बोर्डाने अनौपचारिकरित्या या चित्रपटाच्या नावाला आक्षेप घेतला असल्याचे या याचिकेत म्हटले होते. या संदर्भात सरकारची बाजू मांडताना उप अधिवक्ता ओम शालिनी यांनी म्हटले की, जानकी हे हिंदू देवी सीता हिचे नाव आहे. धार्मिक नावे वापरण्याच्या कायद्यांच्या हे विरुद्ध आहे. त्यावर न्यायमूर्ती एन नागरेश यांनी जोरदार आक्षेप घेतला. न्यायालयाने म्हटले की, ती बलात्कारपिडीत आहे आणि या चित्रपटात ती आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात लढत आहे. त्यामुळे या नावाला आक्षेप असण्याचे कारणच नाही. सेन्सॉर बोर्ड लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे. आता तुम्ही दिग्दर्शक व कलाकारांना सांगणार का की पात्रांची नावे काय असावीत. जानकी या नावात चुकीचे काय आहे? ते धर्माशी कसे काय जोडता येईल. ते कलाकारांचे स्वातंत्र्य आहे व तुम्हाला त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. तुमचे म्हणणे पटावे असे काही कारणही तुमच्याकडे नाही मिळत.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या