Home / देश-विदेश / Wife And Son Ends Life : भाऊबीजेच्याच दिवशी महिलेचा मुलासह विष प्राशन करून मृत्यू..

Wife And Son Ends Life : भाऊबीजेच्याच दिवशी महिलेचा मुलासह विष प्राशन करून मृत्यू..

Wife And Son Ends Life : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भाऊबीजेसाठी(Bhai Dooj) पत्नीने पतीकडे (Husband and...

By: Team Navakal
Bihar Encounter

Wife And Son Ends Life : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भाऊबीजेसाठी(Bhai Dooj) पत्नीने पतीकडे (Husband and Wife) माहेरी जाण्यासाठी तगादा लावला होता. पत्नीला माहेरी जाण्यास नकार दिल्याने जोडप्यात जोरदार भांडण झाल. त्यानंतर संतप्त झालेल्या पत्नीने तिच्या नऊ वर्षांच्या मुलासह विष प्राशन करून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेने परिसरात मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील बांदा पोलिस स्टेशन हद्दीतील नारायणपूर गंगा गावात ही भयंकर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. गावातील रहिवासी पंकज कुमार हे त्यांची पत्नी आरती आणि नऊ वर्षांचा मुलगा प्रतीक यांच्यासोबत राहत होते. त्यांची १० वर्षांची भाची सुष्मिता देखील त्यांच्यासोबतच राहत होती. या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरतीने भाऊबीजनिमित्त तिच्या माहेरी जाण्याचा आग्रह धरला होता. परंतु तिच्या पतीने त्यासाठी स्पष्ट नकार दिला.

यादरम्यान पंकजचा मुलगा प्रतीक आणि भाची सुष्मिता यांच्यात छोट्याश्या कारणावरुन भांडण झाले. पत्नीने हा मुद्दा धरुन माहेरी जाण्याचा तगादा लावला. मात्र, पतीने त्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या पत्नीने प्रथम घरात साठवलेले सल्फा तिच्या ९ वर्षांच्या मुलाला पाजला आणि नंतर स्वतः ते प्राशन करून आत्महत्या केली.

पत्नीने विषारी पदार्थ प्राशन केल्याचे कळताच पतीने पत्नी आणि मुलाला केंद्रीय आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. ग्रामीणच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी अधिकाऱ्यांना संपूर्ण घटनेची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले.


हे देखील वाचा –

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ प्रकरणात मोठा ट्विस्ट.. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या