न्यूयॉर्क- बिल गेट्स यांनी नुकतीच एक थरकाप आणणारी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या वक्तव्याने तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक गेट्स यांनी म्हटले की, ए.आय. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे जी क्रांती झाली आहे त्याच्या परिणामी भविष्यात केवळ तीन प्रकारच्या नोकऱ्या टिकून राहण्याची शक्यता आहे. बाकी सर्व प्रकारच्या नोकऱ्यांत जे काम केले जाते ते मशीन वापरून कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केले जाईल . तिथे माणूस नेमण्याची गरज नाही .
जशी-जशी कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक सशक्त आणि जलद होईल तशी बहुतेक सर्व पारंपरिक करिअर, नोकऱ्या नष्ट होतील.मग काय टिकेल? गेट्स यांच्या मते जिथे मानवी संवेदनांची गरज आहे किंवा अत्यंत सूक्ष्म तंत्रज्ञानाची गरज आहे अशीच क्षेत्र मानवींसाठी खुली राहतील. इतर सर्व क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर संगणक करील. मानवासाठी कोणती क्षेत्र खुली राहतील त्याची यादीच गेट्स यांनी दिली आहे.
1) आरोग्यसेवा
2) इथे मानवी सहानुभूती आणि रुग्णांशी संवाद महत्त्वाचा आहे.
3) इंजिनिअरिंग आणि ए.आय. चा विकास करणारी प्रणाली यात जटिल प्रणाली तयार करण्यासाठी मानवी बुद्धिमत्ता गरजेची राहील.
4) सर्जनशील क्षेत्र कलाकार, लेखक आणि डिझायनर, चित्रकार अशी क्षेत्र ज्यात मानवी विचार आणि मानवी अभिव्यक्ती महत्त्वाच्या ठरतात.
मात्र या सर्व नोकऱ्याही पूर्णपणे सुरक्षित नाहीत. गेट्स म्हणतात की, यातही ए.आय. बऱ्याच प्रमाणात आगेकूच करू शकते. त्यामुळे मानवी भावना, सर्जनशीलता किंवा गहन तांत्रिक कौशल्य याची गरज असेल त्याच नोकऱ्या काळाच्या कसोटीवर टिकतील.
बिल गेट्स यांनी ही चेतावणी दिल्याने आगामी काळात कोणते शिक्षण घ्यावे,
कोणत्या नोकऱ्या उपलब्ध राहतील , सामान्यांची आर्थिक स्थिती कशी राहील याबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
चॅटजीपीटी, ग्रॉक आणि जेमिनी सारखी ए.आय. साधने वेगाने विकसित होत आहेत, अनेकांना मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आणि नोकरींच्या विस्थापनाची भीती निर्माण झाली आहे. सरकारे आणि उद्योग यांनी येणारा बदल मान्य करून त्यानुसार कामगारांचे पुनः कौशल्य प्रशिक्षण करावे, शैक्षणिक अभ्यासक्रमाचा पुनर्विचार करावा असा आग्रह गेट्स करत आहेत.
त्यांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे. ए.आय. फक्त येत नाही, तो आधीच इथे आहे. जर आपण लवकर त्यानुसार बदल केले नाहीत तर लाखो लोक लवकरच निरुपयोगी ठरून बेकार होतील. बिल गेट्स यांच्या या अत्यंत महत्त्वाच्या संदेशाने सर्वच क्षेत्रात चलबिचल निर्माण झाली आहे.
