अमेझॉनचे बाजारमूल्य १९० अब्ज डॉलर्सने वाढले

जागतिक शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठी उलथापालथ होत असताना दुसरीकडे अमेझॉनच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे अमासोनचे बाजारमूल्य १९० अब्ज डॉलर्सने वाढले आहे. शेअरमधील तेजीनंतर अॅमेझॉनने कंपनीच्या मूल्यातील एक दिवसीय सर्वात मोठी वाढ नोंदवली आहे.

अमेझॉनही ऑनलाईन रिटेल क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स शुक्रवरी १३.५ टक्क्यांनी वाढले. कंपनीचा तिमाहीचा निकाल लागल्यानंतर शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली. दरम्यान या वाढीमुळे अमेझॉनने ऍपलचा विक्रम मोडला आहे. अॅपलच्या ब्लॉकबस्टर तिमाही अहवालानंतर 28 जानेवारी रोजी अॅपलच्या शेअर बाजार मूल्यात 181 अब्ज डॉलरची एक दिवसीय विक्रमी वाढीचा विक्रम झाला होता.

अमेझॉनचे मूल्य आता सुमारे $1.6 ट्रिलियन इतके झाले आहे. तर मेटा प्लॅटफॉर्मचा शेअर शुक्रवारी 0.3% घसरल्याने, कंपनीचे बाजारमूल्य आता 660 अब्ज डॉलर इतके झाले आहे. गुरुवारी उशिरा कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगला नफा नोंदवल्यानंतर अॅमेझॉनच्या समभागांनी उसळी घेतली.

Scroll to Top