Home / अर्थ मित्र / आता SBI च्या ग्राहकांची सर्व कामे होतील एका कॉलवर!

आता SBI च्या ग्राहकांची सर्व कामे होतील एका कॉलवर!

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचे खाते असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करून म्हटलंय,...

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचे खाते असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करून म्हटलंय, \’तुमच्या घरी सुरक्षित राहा. आम्ही तुम्हाला तुमच्या दारात बँकिंग सुविधा देत आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया सर्व आवश्यक बँकिंग सुविधा तुमच्या दारात पोहोचवत आहे.\’ म्हणजेच आता बँक तुम्हाला एका नंबरवर कॉल किंवा मेसेज करून घरी बसल्या बसल्या अनेक सुविधा देणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने 1800 1234 हा टोल फ्री नंबर जारी केला आहे, ज्याद्वारे तुम्ही फक्त एका कॉल आणि मेसेजद्वारे घरी बसून अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकाल. बँकेनेही ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने सांगितले आहे की, फक्त एका नंबरद्वारे तुमची सर्व महत्त्वाची कामे काही मिनिटांत होतील.

या नंबरद्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक जाणून घेऊ शकता. याशिवाय, तुमच्या शेवटच्या ५ व्यवहारांचे तपशीलदेखील जाणून घेऊ शकता. तुम्ही एटीएम कार्ड ब्लॉक आणि जारी करण्याची विनंतीदेखील करू शकता. तसेच तुम्ही घरी बसल्या बसल्या एटीएम आणि ग्रीन पिन तयार करू शकता. याशिवाय तुमचे जुने एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर नवीन एटीएम कार्ड जारी करण्यासाठी अर्ज करू शकता.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या