Home / अर्थ मित्र / आयसीआयसीआयकडून FD वरील व्याजदरात वाढ

आयसीआयसीआयकडून FD वरील व्याजदरात वाढ

आयसीआयसीआय बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. हे नवीन दर 10 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत. बँकेने आपल्या...

Social + WhatsApp CTA

आयसीआयसीआय बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. हे नवीन दर 10 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत.

बँकेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 4.6 टक्के व्याज मिळेल. यासाठी 3-10 वर्षे कालावधी आहे. जर कालावधी 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी असेल तर ग्राहकांना 4.50 टक्के व्याज मिळेल.

कोणत्या कार्यकाळासाठी FD वर किती व्याज आहे?

  • 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर सर्व दर लागू आहेत.
  • ग्राहकाला 15 महिने किंवा त्याहून अधिक आणि 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 4.2 टक्के व्याज मिळेल.
  • 18 महिने किंवा त्याहून अधिक आणि 2 वर्षांपेक्षा कमी एफडीवर 4.3 टक्के व्याज असेल.
  • १ वर्ष ते 15 महिन्यांसाठी FD करणाऱ्या ग्राहकाला 4.15 टक्के व्याज मिळू शकते.
  • १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर बँक 2.5 टक्क्यांवरून 3.7 टक्के व्याज देत आहे.
Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या