डिजिटल ब्रोकरची निवड कशी करावी?

भारतातील अभूतपूर्व डिजिटल स्वीकाराचा थेट परिणाम सुरक्षितता व एक्सचेंज इंडस्ट्रीवर झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीसारख्या बेंचमार्क निर्देशांकांनी जवळपास 50% पेक्षा जास्त परतावे मागील 4 वर्षात दिले. ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ सारख्या उपक्रमांनी पाठिंब दर्शवलेल्या भारतीय बाजजाराने शाश्वत गती दर्शवली आहे. जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना या संधीचा फायदा घ्यायचा आहे. त्यामुळे शेअर गुंतवणुकीच्या जगात प्रवेश करण्याची इच्छा पूर्ण करण्याची प्रक्रिया समजून घेणे इष्ट ठरेल.

ट्रेडिंग प्लॅटफॉर्म : डिजिटल ब्रोकरची निवड करण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ते ट्रेडिंगकरिता माहितीपूर्ण प्लॅटफॉर्मची सुविधा देतात. ऑफलाइन ब्रोकर तुम्हाला स्टॉकविषयी शिफारशी देतात. मात्र त्या स्टॉकमध्ये स्वत: रिसर्च करणे तुम्हाला अवघड जाईल. त्यामुळे गुंतवणूकदारांना वरवरचे विश्लेषण करून समाधान मानावे लागेल किंवा ब्रोकरवर अंधपणाने अवलंबून राहावे लागते. यामुळे गतीला आव्हान मिळते व खरेदी-विक्री दरम्यान अयोग्य किंमतींना सामोरे जावे लागते.

डिजिटल ब्रोकरकडे गेल्यास हे सर्व प्रश्न तात्काळ सुटतात. असे ब्रोकर विशेष करून शेअरच्या आलेखाची सुविधा, मार्केट स्कॅनर आणि मोबाइल ट्रेडिंग ॲप्लिकेशनची सुविधा पुरवतात. या घटकांमुळे डिजिटल ब्रोकर हा गुंतवणूकदारासाठी महत्त्वाचा ठरतो. ब्रोकरने त्याच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर किती शुल्क लावले आहे, हे तपासून पाहावे.

ट्रेडिंग किंमत : डिजिटल ब्रोकरचे महत्त्व सांगण्यामागील आणखी एक कारण म्हणजे ट्रेडिंगची किंमत. ट्रेडिंग कॉस्टमध्ये ब्रोकरेज व व्यवहार शुल्कापासून एएमसी, डिमॅट चार्ज आणि टॅक्सपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. आता त्यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे परसेंटेज आधारीत ब्रोकरेज. म्हणजेच प्रत्येक व्यापार मूल्यावर (खरेदी किंवा विक्री दोन्हीतही) तुम्हाला पूर्वनिश्चित टक्के शुल्क द्यावे लागते.

ऑफलाइन ब्रोकर आणि काही डिजिटल ब्रोकरदेखील परसेंटेज आधारीत ब्रोकरेज पद्धत वापरत असल्याने गुंतवणुकदारांसाठी ते कमी फायद्याचे ठरते. तथापि, अग्रेसर डिजिटल ब्रोकर कमी शुल्क आकारतात, तर काही फिक्स ब्रोकरेज घेतात, संपूर्ण ऑर्डरच्या एकूण मूल्याऐवजी ट्रेड ऑर्डरवर फ्लॅट फी आकारली जाते. काही डिजिटल ब्रोकर्सचे इक्विटी डिलिव्हरीसाठी शून्य ब्रोकरेजदेखील असे. अशा घटकांमुळे आपल्या एकूण कमाईत मोठा फरक पडतो.

संशोधन क्षमता : सध्याचे डिजिटल युग व डाटा हे नवे तेल व सोन्यासारखे आहे. स्टॉकच्या किंमती वित्त, बाजारातील कामगिरी, त्रैमासिक निकाल, प्रमोटर शेअरहोल्डिंग पॅटर्न, रेग्युलेटरी उपाययोजना, जिओपॉलिटिकल घटना, गुंतवणुकादारांच्या भावना इत्यादी विस्तृत श्रेणीतील डाटावर आधारीत असतात. त्यामळे शेअर बाजारातील स्टॉक्सच्या किंमतींचा बऱ्यापैकी अंदाज येतो. तंत्रज्ञान हे डिजिटल ब्रोकर्सचे वैशिष्ट्‌य असल्यामुळे ते अत्याधुनिक संशोधनाची क्षमता बाळगून असतात. काही अत्याधुनिक डिजिटल ब्रोकर्सनी गुंतवणूक इंजिनही विकसित केले आहेत, जे एखादी शिफारस करण्यापूर्वी 1 अब्ज डाटा पॉइंट्सचे विश्लेषण करते.

मार्जिनचा फायदा : खऱ्या गुंतवणुकीपेक्षा जास्त ट्रेडिंग करण्यासाठी मार्जिन ट्रेडिंग केली जाते. डे ट्रेडर्समार्फत ही सुविधा वापरली जाते. तसेच तुमच्या एकंदरीत प्रॉफिटमध्ये मोठा फरक दिसून येतो. पण तुम्ही स्टॉक ट्रेडिंगमध्ये नवे असाल तर तुम्ही मार्जिन ट्रेडिंगमधील जोखीम समजून घेतली पाहिजे. गोष्टी हाताबाहेर गेल्या तर तुम्ही तुमच्या गुंतवणूकीचे पूर्ण नुकसान होण्यापासून वाचवू शकतात. ही सुविधा फक्त अनुभवी ट्रेडर्सनी त्यासोबतची जोखीम समजून घेत वापरली पाहिजे.

ग्राहक सेवा : अखेरचे म्हणजे, डिजिटल ब्रोकर तुम्हाला केवळ एका बटणाच्या स्पर्शाद्वारे अनेक सेवा उत्कृष्टरित्या प्रदान करतो. त्यापैकी काहींकडे ऑनलाइन कस्टमर केअर प्रतिनिधी, रिलेशन मॅनेजर्स आणि 24*7 कस्टमर हेल्पलाइन नंबर्सची सुविधा असते. मूल्य आधारीत ब्रोकर्स यापुढेही जाऊन निवडक रिसर्च मटेरिअल्स गुंतवणूकदारांसाठी पुरवतात व वैयक्तिकृत सल्ला देतात. तुम्ही वेबिनार्स, पॉडकास्ट्स आणि इतर संबंधित ग्राहक केंद्रित उपक्रमांचाही लाभ घेऊ शकता.
भारतातील सकारात्मक बिझनेस स्थितीसह रिटेल गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग पाहता, भारतीय शेअर बाजाराला अद्याप बरीच प्रगती करायची आहे, असे म्हणता येईल. जानेवारी 1999 व जानेवारी 2009 दरम्यान ते तीन पटींनी वाढले. पुढील 10 वर्षात ते जवळपास चौपट होईल. आतापासूनची गुंतवणूक 10 वर्षांनी कुठे असेल, याचा विचार करा आणि हुशारीने गुंतवणूक करा.

Scroll to Top