HDFC बँकेच्या ज्येष्ठ नागरिक विशेष एफडीची मुदत वाढवली

HDFC बँकेने आपल्या ज्येष्ठ नागरिक विशेष एफडीची मुदत वाढवली आहे. ही मुदत आता ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपणार आहे. या योजनेला ज्येष्ठ नागरिक काळजी एफडी योजनाही म्हटलं जातं.

कोरोना संसर्गाच्या काळात एचडीएफसी बँकेने १८ मे २०२० रोजी ही विशेष एफडी योजना सुरू केली होती. त्यानुसार, जर एखाद्या नागरिकाने 1 दिवस ते 10 वर्षांसाठी 5 कोटी रुपये गुंतवले तर त्याला 30 सप्टेंबर 2022 पर्यंत 0.७५% अतिरिक्त प्रीमियम दिला जाईल, जो सध्याच्या प्रीमियमपेक्षा 0.50% असेल. म्हणजेच 75 बेसिस पॉइंट्स (bps) चा फायदा होईल.

एचडीएफसी बँक मुदत ठेवींवर 5.60 टक्के व्याज देते. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना ६.३५ टक्के व्याज देते. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत हे दर लागू असणार आहेत, त्यामुळे ६० आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी यात गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळू शकतो.

Scroll to Top