कोणत्या बँकांमध्ये झाले सर्वाधिक फ्रॉड?

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सोमवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिलेल्या माहितीनुसार, देशात बँकिंग फ्रॉड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या बँक नेमक्या कोणत्या आहेत, हे आज आपण जाणून घेऊया.

या फ्रॉडमध्ये कोटक महिंद्रा बँक सर्वात पहिल्या नंबरवर आहे. 2021-22 च्या सुरुवातीच्या नऊ महिन्यात कोटक महिंद्रा बँकेत बँकिंग फ्रॉडच्या 642 घटना समोर आल्या. या फ्रॉडमध्ये 1 लाख किंवा त्याहून अधिकची फसवणूक झाली आहे.

कोटक महिंद्रा बँकेनंतर बँकिंग फ्रॉडमध्ये आयसीआयसीआय बँक दुसऱ्या क्रमांकावर आणि इंटसइंड बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीआयसीआयमध्ये 518 बँकिंग फ्रॉडची प्रकरण समोर आली आहेत. तर इंटसइंड बँकेत 377 फ्रॉड केसेस समोर आल्या आहेत.

दरम्यान, आरबीआयच्या आकडेवारीनुसार, 2017 मध्ये 135 फ्रॉड, 2018 मध्ये 289, 2019 मध्ये 383 आणि 2020 मध्ये 652 फ्रॉडची प्रकरणे समोर आली. तर 2021 मध्ये बँकिंग फ्रॉडच्या घटना 826 पर्यंत पोहोचल्या. आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये पहिल्या 9 महिन्यात फ्रॉडची संख्या 642 पर्यंत पोहोचली.

Scroll to Top