क्रिप्टोवर कर लागला तरी त्याला चलन म्हणून मान्यता मिळणार नाही

क्रिप्टो करन्सीला भारतात मान्यता नसली तरीही त्यावरील उत्पन्नात कर लावल्याने याला अप्रत्यक्षरित्या मान्यता दिली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, क्रिप्टो करन्सीमधून मिळालेल्या नफ्यासाठी वेगळा स्तंभ असणार असल्याचे प्राप्तिकर विभागाने सांगितले आहे. महसूल सचिव तरुण वाजपेयी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, क्रिप्टो करन्सीवरील उत्पन्नावर ३० टक्के कर आणि अधिभार लागणार आहे. मात्र असे असले तरीही क्रिप्टोला चलन म्हणून मान्यता मिळणार नसल्याचेही वाजयेपी यांनी सांगितले आहे.

भारतात घोड्याच्या शर्यतीवरील किंवा इतर सट्ट्यासारख्या उत्पन्नावरील कर आकारला जातो. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीवरील उत्पन्नावरही कर आकारणार आहेत. तसेच, क्रिप्टोला तांत्रिकदृष्ट्या मान्यता मिळण्याची ही प्रक्रिया असल्याचेही वाजपेयी यांनी सांगितले. असं असतानाच क्रिप्टो करन्सीचे नियमन कसे होणार हे अजूनही स्पष्टता आलेली नाही. ते विधेयकानंतर स्पष्ट होईल, असंही वाजयपेयी यांनी स्पष्ट केलं.

क्रिप्टो करन्सी उत्पन्नावरील कराची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. क्रिप्टोमध्ये तोटा झाला तर तो तोटा इतर उत्पन्नातून भरून काढता येऊ शकणार नाही, त्यामुळे क्रिप्टो करन्सी व्यवहार करताना अनेक मर्यादा येणार आहेत.

कर भरताना अनेक करदाते क्रिप्टो करन्सीवरील उत्पन्न विवरण पत्रात सादर करतात. मात्र, काही जण हे उत्पन्न लपवतात. तसेच, क्रिप्टो करन्सीचा व्यवहार पारदर्शी राहण्याकरता प्रत्येक व्यवहारातून स्रोतातून एक टक्के कर कपात केली जाणार आहे. यालाच टीडीएस असे म्हणतात. ही टीडीएस प्रक्रिया १ जुलैपासून सुरू होणार आहे.

Scroll to Top