Home / अर्थ मित्र / पत्नीच्या नावाने पैसे गुंतवले तर कर भरावा लागेल का?

पत्नीच्या नावाने पैसे गुंतवले तर कर भरावा लागेल का?

वर्षातील सण-उत्सव आता एकामागून एक येत आहेत. तुम्हाला होळीनिमित्त किंवा गुढीपाडवानिमित्त आपल्या पत्नीला खास भेटवस्तू देऊन खूष करायचे असल्यास ही...

वर्षातील सण-उत्सव आता एकामागून एक येत आहेत. तुम्हाला होळीनिमित्त किंवा गुढीपाडवानिमित्त आपल्या पत्नीला खास भेटवस्तू देऊन खूष करायचे असल्यास ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. कर नियमानुसार, पतीने जर पत्नीच्या नावावर बँकेत अथवा इतर कोणत्या ठिकाणी काही गुंतवणूक केली तर ही गुंतवणूक भेट म्हणून मानली जाते.

तसेच प्राप्तिकर नियमांनुसार, नातेवाईकांकडून मिळालेल्या रोख भेटवस्तूंना पूर्णपणे सूट आहे. ज्या नातेवाईकांसाठी हा नियम लागू होतो त्यात पती, पत्नी, भाऊ, बहीण, भावाची किंवा बहिणीची पत्नी किंवा पती, व्यक्तीच्या आईवडिलांची बहीण किंवा भाऊ (आत्या, मावशी, मामा), कायद्यात नमूद केल्यानुसार व्यक्तीचे वारस यांच्याकडून मिळणाऱ्या भेटींना करातून सूट देण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे एका आर्थिक वर्षात एक किंवा अनेक व्यक्तींकडून मिळालेली एकूण रोख रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यावर लागू स्लॅब रेटनुसार कर लागेल. त्यामुळे हा कर टाळण्यासाठी मिळालेल्या भेटवस्तूंची एकूण रक्कम एका आर्थिक वर्षात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी. .

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या