\’भारतपे\’ची व्यापाऱ्यांसाठी सोने कर्ज सेवा

BharatPeने त्यांच्या व्यापारी भागीदारांसाठी गोल्ड लोन सेवा सुरू केली आहे. कंपनीने व्यापाऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंतचे सोने कर्ज देण्यासाठी नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीसोबत भागीदारी केली आहे.

भारतपेचे सीईओ सुहेल समीर यांनी सांगितले की, गोल्ड लोन आम्हाला आमच्या व्यापारी भागीदारांना अधिक सक्षम करण्यास आणि लाखो लहान व्यवसायांना मदत करण्यास सक्षम करेल. आम्ही प्रायोगिक तत्त्वावर 2 महिन्यांसाठी हे सुरू केले आणि त्या दरम्यान 10 कोटींचे कर्ज वितरित केले. या काळात मिळालेला प्रतिसाद खूप चांगला आहे.

दरम्यान, भारते पेचे गोल्ड लोन दरमहा 0.39 टक्के किंवा वार्षिक 4.68 टक्के व्याजदराने दिले जाईल. कर्ज अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे आणि कंपनीने अर्जाच्या फॉर्मचे मूल्यांकन करून 30 मिनिटांत कर्ज वितरित करण्याचा दावा केला आहे.

कंपनीने म्हटले आहे की, भागीदार व्यापारी भारतपे ऍपवर उपलब्ध कर्ज पाहू शकतात आणि ऍपद्वारेच कर्जासाठी अर्ज करू शकतात. हे कर्ज सहा महिने, नऊ महिने आणि बारा महिन्यांच्या कालावधीत उपलब्ध आहे. तसेच कर्जाच्या परतफेडीसाठी लवकरच ईएमआय पर्याय सुरू केला जाणार आहे.

Scroll to Top