राज्यात विदेशी गुंतवणूकदारांच्या संख्येत घट

2021-22 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एकूण 48,633 कोटींची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे, जी गेल्या वर्षी 1,19,734 कोटी होती. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातून हे समोर आले.

गुरुवारी विधानसभेत मांडण्यात आलेल्या अहवालात एफडीआयमध्ये कर्नाटक आघाडीवर असल्याचे दिसून आले. येथे 2021-22 मध्ये 1,02,866 कोटी एफडीआय आले. तर गुजरात राज्य 1,01,145 कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. महत्त्वाचे म्हणजे एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत महाराष्ट्रात 9,59,746 कोटी एफडीआय होते, जे देशाच्या एकूण एफडीआयच्या 28.2 टक्के होते, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

दरम्यान, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-डिसेंबर 2021 या कालावधीत भारतात थेट विदेशी गुंतवणुकीचा इक्विटी फ्लो 16 टक्क्यांनी घसरून USD 43.17 बिलियन झाला आहे, जो मागील याच कालावधीत USD 51.47 बिलियन डॉलर होता.रून USD 43.17 बिलियन झाला आहे, जो मागील याच कालावधीत USD 51.47 बिलियन डॉलर होता.

Scroll to Top