Home / अर्थ मित्र / रिलायन्स होम फायनान्स, अनिल अंबानी आणि इतर तिघांवर लिलावात बंदी

रिलायन्स होम फायनान्स, अनिल अंबानी आणि इतर तिघांवर लिलावात बंदी

रिलायन्स होम फायनान्स, अनिल अंबानी आणि इतर तिघांना सेबीने बंदी घातली आहे. या तिघांनाही लोकांकडून पैसे उभारण्याच्या कोणत्याच प्रक्रियेत सहभागी...

Social + WhatsApp CTA

रिलायन्स होम फायनान्स, अनिल अंबानी आणि इतर तिघांना सेबीने बंदी घातली आहे. या तिघांनाही लोकांकडून पैसे उभारण्याच्या कोणत्याच प्रक्रियेत सहभागी न होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना बाजारातील खरेदी विक्री किंवा कोणत्याही व्यवहारात प्रत्यभ अथवा अप्रत्यक्षपणे काम करता येणार नाही. सेबी ने हे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा जारी केले.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला प्राप्त झालेल्या काही तक्रारीनुसार कंपनीचे प्रवर्तक आणि व्यवस्थापनाद्वारे पैसे काढणे, वळवणे आणि बँकांकडून फसवणूक करून मॉनिटरिंग रिटर्न्स प्राप्त केल्याचा आरोप आहे. त्यामुळे होम फायनान्स, अनिल अंबानी आणि इतर तिघांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार रोखे बाजारातून त्यांच्यावर ही बंदी घालण्यात आला आहे.

तसेच पुढील आदेश येईपर्यंत सेबीमध्ये नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थाशी, कोणत्याही सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीशी किंवा सार्वजनिक कंपनीचे संचालक/प्रवर्तक म्हणून काम करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे असे सेबीने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या