Alkyl Amines Chemicals: १२७ रुपयांच्या शेअरची किंमत झाली २९६३; आठ वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

शेअर बाजारात पैसा गुंतवताना गुंतवणूकदारांकडे संयम असणेही फार गरजेचे आहे. कारण अनेकदा दिर्घ कालावधीच्या गुंतवणुकीत मोठा परतावा मिळण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्या सुरुवातीला कमी परतावा देत असल्या तरीही पुढे जाऊन त्याच कंपनीकडून जास्त परतावा मिळू शकतो. अशीच एक कंपनी म्हणजे रासायनिक उत्पादक Alkyl Amines Chemicals कंपनी. या कंपनीने गेल्या आठ वर्षांत गुंतणूकदारांना 3 हजार टक्के परतावा दिला आहे. तसेच, या कालावधीत BSE सेन्सेक्समध्ये 160 टक्के वाढ झाली आहे.

अल्काइल अमाइन केमिकल्स लि. (AACL) चा स्टॉक गेल्या आठ वर्षात 2893 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीचा शेअर 16 मार्च 2014 रोजी 127 रुपयांवरून 16 मार्च 2022 रोजी 2,963 रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीने ३७ टक्के परतावा दिला आहे. मात्र, अस्थिर शेअर बाजारातील परिस्थितीमुळे या शेअरममध्ये गेल्या महिन्याभरात तीन टक्क्यांनी घट झाली आहे. परंतु गेल्या आठ वर्षाचा विचार केल्यास जर गुंतवणूकदाराने २०१४ साली १० हजार रुपये गुंतवले असते तर त्यांना आज ६ लाख रुपये परतावा मिळाला असता.

गेल्या 30 वर्षांपासून अल्काइल अमाइन केमिकल्स लि ही कंपनी अॅलिफॅटिक अमाइन्स, एमाइन डेरिव्हेटिव्ह्ज आणि इतर विशेष रसायनांच्या उत्पादन आणि मार्केटिंगच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनी फार्मास्युटिकल, अॅग्रोकेमिकल, रबर केमिकल आणि वॉटर ट्रीटमेंट इंडस्ट्रीज इत्यादींना अमाईन आणि अमाइन आधारित रसायनांचा पुरवठा करते. तसेच, या कंपनीचा जागतिक स्तरावरही व्यवसाय सुरू आहे. कंपनीकडे महाराष्ट्रातील पाताळगंगा आणि कुरकुंभ तसेच गुजरातमधील दहेज येथे 12 उत्पादन प्रकल्पांसह तीन ठिकाणी प्लांट आहेत.

Scroll to Top