Credit Card use Disadvantages: क्रेडिट कार्डच्या मदतीने तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरीही आर्थिक व्यवहार करणे सहज शक्य होते. क्रेडिट कार्ड (Credit Card use Disadvantages) वापरून तुम्ही कोणतीही वस्तू सहज खरेदी करू शकता. शिवाय, खरेदीवर सूट आणि रिवॉर्ड पॉइंट असे फायदेही मिळतात. पण काही लोक क्रेडिट कार्डचा वापर एटीएममधून पैसे काढण्यासाठी करतात.
तुम्ही देखील एटीएममधून क्रेडिट कार्ड वापरून पैसे काढत असाल तर, त्याआधी याचे तोटे जाणून घ्यायला हवे.
कॅश ॲडव्हान्स चार्ज
क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढल्यास तुम्हाला 2.5% ते 3% पर्यंत ‘कॅश ॲडव्हान्स चार्ज’ द्यावा लागतो. तुम्ही खरेदी करताना ज्याप्रमाणे क्रेडिट कार्डवर व्याजमुक्त कालावधी मिळतो, तो पैसे काढताना मिळत नाही.
पैसे काढल्याच्या दिवसापासूनच त्यावर व्याज सुरू होते. हे व्याज तुम्ही परतफेड करेपर्यंत चालू राहते. यामुळे, तुमच्यावर मोठी आर्थिक जबाबदारी येऊ शकते.
लेट पेमेंट फीस आणि सिबिल स्कोअरवर परिणाम
जर तुम्ही क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल वेळेवर भरले नाही, तर उरलेल्या रकमेवर 15% ते 30% पर्यंत लेट पेमेंट फीस (Late Payment Fees) लागू शकते. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअरही (Credit Score) खराब होऊ शकतो.
क्रेडिट कार्डमधून पैसे काढल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर थेट परिणाम होत नसला तरी, तुम्ही किमान देय रक्कम ळेवर न भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होण्याची शक्यता वाढते.
एटीएम मेंटेनन्स फीस
डेबिट कार्डप्रमाणेच क्रेडिट कार्डवरही दर महिन्याला 5 मोफत एटीएम व्यवहार मिळतात. यानंतर, एटीएम मेंटेनन्स फीस किंवा इंटरचेंज फीस आकारली जाते, ज्यात कर समाविष्ट नसतो. त्यामुळे अनावश्यक शुल्क भरावे लागते.